गुढीपाडवा-रमजान ईददरम्यान दंगलीसह बॉम्बस्फोटाचा ट्विट
संभाव्य धमकीनंतर मुंबई शहरात सर्वत्र सतर्कचा इशारा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मार्च 2025
मुंबई, – गुढीपाडवा आणि रमजान ईदरम्यान शहरात दंगलीसह बॉम्बस्फोट होणार असल्याचा ट्विट अज्ञात व्यक्तीकडून नवी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला पाठविण्यात आला आहे. या धमकीनंतर मुंबई शहरातील बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आला असून सर्वत्र सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. बांगलादेशी-पाकिस्तानी नागरिक डोंगरी परिसरात राहत असून या नागरिकांकडून डोंगरी परिसरात मोठ्या प्रमाणात जाळपाळ आणि दंगली घडवून बॉम्बस्फोट होणार असल्याचा ट्विट अज्ञात व्यक्तीने केल्याचे एका अधिकार्याने बोलताना सांगितले.
रविवारी 30 मार्च गुढीपाडवा आणि 31 मार्चला रमजान ईद असल्याने शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. सर्वच पोलीस ठाण्यांना सतर्कचा इशारा देण्यात आला असून परिसरात जास्तीत जास्त गस्त आणि नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. एकीकडे पोलिसांनी शहरातील बंदोबस्तात वाढ केली असताना गुरुवारी रात्री उशिरा नवी मुंबईच्या मेन कंट्रोल रुमला एका ट्विट प्राप्त झाला आहे. त्यात डोंगरी परिसरात काही बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहे. या नागरिकांकडून डोंगरी परिसरात मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दंगली घडविण्यात येणार आहे. या दंगलीचा फायदा घेऊन बॉम्बस्फोट होणार आहे. हा ट्विट नंतर मुंबई पोलिसांना पाठविण्यात आला होता. या ट्विटची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत सर्वच पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
संशयित व्यक्तींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुस्लिमबहुल वस्तीत पोलिसांनी अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. संशयित व्यक्तींच्या हालचालीवर बाईक नजर ठेवली जात आहे. दुसरीकडे सायबर सेल विभागाने अत्याधुनिक तांत्रिक पद्धतीचा वापर करुन धमकी देणार्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. हा ट्विट नक्की कोठून आला आणि तो कोणी पाठविला याचा तपास सुरु आहे. मुंबईकरांनी गुढीपाडवा आणि ईद आनंदाने साजरा करावा, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संशयित व्यक्तींची माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला द्यावी. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची सर्वच मुंबईकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.