पॅरीस-मुंबई विमानात बॉम्बच्या धमकीने तणावाचे वातावरण

संपूर्ण विमानाची तपासणीनंतर ती अफवा असल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ जून २०२४
मुंबई, – पॅरीस-मुंबई विमानात बॉम्बच्या धमकीने एकच खळबळ उडाली होती. या विमानाचे तातडीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करण्यात आले होते, संपूर्ण विमानाची तपासणी केल्यानंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे विमानातील प्रवाशांसह कर्मचार्‍यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.

पॅरीसहून २९४ प्रवाशी आणि बारा कर्मचार्‍यांना घेऊन जाणारे विस्तारा कंपनीचे एक विमान निघाले होते. या विमानात बॉम्ब असल्याचा एक पत्र सापडले होते. पॅरीसच्या चार्ल्स डी ग्युले विमानतळावरील एअर सिकनेस बॅगेवर हाताने लिहिलेले पत्र सापडल्यानंतर ही माहिती विमानातील पायलटसह इतर अधिकार्‍यांना देण्यात आली होती. सकाळी दहा वाजता या विमानाचे तातडीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. बॉम्बशोधक व नाशक पथकासह श्‍वान पथकाने संपूर्ण विमानाची तपासणी केली, मात्र विमानात संंबंधित अधिकार्‍यांना कुठलीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस येताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. या घटनेची सहार पोलिसांनी नोंद करुन तपास सुरु केला आहे. गेल्या काही दिवसांत बॉम्ब असल्याच्या निनावी कॉलची मालिका सुरु आहे. मात्र तपासणीनंतर ती अफवा असल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे अशा बॉम्बच्या अफवेमुळे मुंबई पोलिसांवर प्रचंड ताण पडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page