मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 डिसेंबर 2025
मुंबई, – चार वर्षांपूर्वी बोरिवली परिसरात एका अल्पवयीन मुलावर अनैसगिंक लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या नरेशकुमार हरेशकुमार माहोर या 44 वर्षांच्या आरोपीस दिडोंशीतील पोक्सो कोर्टाने दोषी ठरवून वेगवेगळ्या कालमांतर्गत कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याला पोक्सो कोटा्रने वीस वर्षांच्या सक्तमजुरीसह दोन हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
यातील पिडीत मुलगा बोरिवली परिसरात राहतो. चार वर्षांपूर्वी त्याच्यावर आरोपी नरेशकुमारने अनैसगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्याच्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी 377 भादवी सहकलम 4, 6, 8, 12 पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण होताच त्याच्याविरुद्ध दिडोंशीतील पोक्सो कोर्ट क्रमांक नऊमध्ये आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची नियमित सुनावणी सुरु होती.
या खटल्याची अलीकडेच सुनावणी पूर्ण झाली होती. यावेळी कोर्टाने नरेशकुमारला भादवीसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत दोषी ठरविले होते. त्यानंतर त्याला 377 भादवी कलमांतर्गत दहा वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजाराचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन तीन महिने सक्तमजुरी, कलम 05 (1), (एम) सह 6 प्रमाणे वीस वर्षांची सक्तमजुरी आणि दोन हजाराचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन तीन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली आहे.
या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांनी केला तर सरकारी अभियोक्ता म्हणून मालनकर यांनी काम केले. पोलीस हवालदार मुंढे, किणी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.