३८ लाखांच्या हेरॉईनसह उत्तरप्रदेशातील दोन तस्करांना अटक

३८४ ग्रॅम हेरॉईनचा साठा जप्त; दोघांना पोलीस कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ जानेवारी २०२४
मुंबई, – सुमारे ३८ लाखांच्या हेरॉईनसह दोघांना बोरिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने मिरारोड येथून अटक केली. शोएब मेहवाब अन्सारी आणि अभिषेक रामजीलाल कुमार अशी यादोघांची नावे असून ते दोघेही उत्तरप्रदेशातील रहिवाशी आहे. या दोघांकडून पोलिसांनी ३८४ ग्रॅम वजनाचे हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्घ एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे त्यांच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता चार झाली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी ४७२ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले असून त्याची किंमत ४७ लाख २० हजार रुपये इतकी आहे.

गेल्या आठवड्यात बोरिवलीतील जयवंत सावंत मार्ग, सुधीर फडके ब्रिजजवळ हेरॉईन विक्रीसाठी आलेलया परवेज आलम कासिम अन्सारी या ४५ वर्षांच्या आरोपीस बोरिवली पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी ८७ ग्रॅम वजनाचे आठ लाख सत्तर हजार रुपयांचे हेरॉईन पोलिसांनी जप्त केले होते. त्याच्या चौकशीनंतर या पथकाने नालासोपारा येथून इरफान जरीन खान याला ताब्यात घेतले होते. तो नायगाव, नालासोपारा परिसरात हेरॉईनची विक्री करत असल्याचे उघडकीस आले होते. त्याच्याकडून पोलिसांनी काही हेरॉईन जप्त केले होते. पोलीस कोठडी असताना त्यांच्या चौकशीतून मिरारोड येथील काशिमिरा, ऑक्ट्रॉय नाका, शालभद्र ग्राम इमारतीमध्ये त्यांचे इतर दोन सहकारी राहत असून ते सर्वांना हेरॉईनचा पुरवठा करतात. त्यांच्या सांगण्यावरुन परवेज आणि इरफान हे दोघेही हेरॉईनची डिलीव्हरी करत होते.

ही माहिती प्राप्त होताच अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभोये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर साळुंके, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद निंबाळकर, इंद्रजीत पाटील, पोलीस शिपाई गरजे, रेवाळे, बहिरम, फर्डे, भोये यांनी शनिवारी सायंकाळी मिरारोडच्या काशिमिरा परिसरातून शोएब अन्सारी आणि अभिषेक कुमार या दोघांना ताब्यात घेतले होते. यावेळी शोएबकडून पोलिसांनी १७ लाख ४० हजार रुपयांचा १७४ ग्रॅम तर अभिषेककडून २१ लाखांचे २१० ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले. या दोघांकडून पोलिसांनी ३८४ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले असून त्याची किंमत सुमारे ३८ लाख रुपये इतकी आहे. याच गुन्ह्यांत नंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर शनिवारी दुपारी त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. शोएब आणि अभिषेक हे दोघेही उत्तरप्रदेशच्या सरहानपूर, रामपूर मनिहरण व नगली महनाजचे रहिवाशी आहे. ते दोघेही मिरारोडच्या शालीगभद्र ग्रॉम दोन सोसायटीमध्ये भाड्याच्या रुममध्ये राहत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हेरॉईन ड्रग्ज विक्री करणारी ही एक आंतरराज्य टोळी असून या टोळीचे इतर काही सदस्यांची नावे समोर आली आहे. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page