नऊ वर्षांच्या मुलीवर निवृत्त पोलीस अधिकार्याकडून विनयभंग
लिफ्टमध्ये अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 डिसेंबर 2025
मुंबई, – नऊ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीशी तिच्याच इमारतीमध्ये राहणार्या वयोवृद्ध निवृत्त पोलीस अधिकार्याने अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बळीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन 67 वर्षांच्या या पोलीस अधिकार्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याने आरोपीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवारी सायकाळी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
33 वर्षांची तक्रारदार महिला बोरिवली परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. याच इमारतीमध्ये आरोपी वयोवृद्ध पोलीस अधिकारी राहतो. हा अधिकारी सध्या पोलीस खात्यातून निवृत्त झाला आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता तक्रारदार महिलेची नऊ वर्षांची मुलगी लिफ्टजवळ उभी होती. यावेळी आरोपीने तिला जबदस्तीने लिफ्टमध्ये आत खेचले. तिच्याशी शारीरिक जवळीक निर्माण करुन तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिच्या गालावर किस केला होता. ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना तयाने तिच्या अंर्तवस्त्रांमध्येहात घालून तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकाराने ही मुलगी प्रचंड घाबरली होती. त्यामुळे घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या तक्रारदार आईला सांगितला होता. मुलीकडून ही माहिती समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी पोलीस अधिकार्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या अधिकार्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्ह्यांत आरोपीला अटक झाली नसून त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आल्याचे एका अधिकार्याने बोलताना सांगितले.