मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ डिसेंबर २०२४
मुंबई, – मद्यप्राशन केलेल्या एका २६ वर्षांच्या तरुणीने गस्त घालणार्या पोलीस उपनिरीक्षकासह दोन महिला कर्मचार्यांना शिवीगाळ करुन नखांसह लाथ्याबुक्यांनी मारहाण केल्याची घटना बोरिवलीतील गोराई परिसरात घडली. याप्रकरणी रेणू रामआधार प्रजापती या तरुणीविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
ही घटना शनिवारी पावणेचार वाजता बोरिवलीतील गोराई जेट्टी, गोराई एकमध्ये घडली. प्रिया काशिनाथ थोरात या विरार येथे राहत असून मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे. सध्या त्यांची नेमणूक बोरिवली पोलीस ठाण्यात आहे. शनिवारी पावणेचार वाजता त्या त्यांच्या सहकार्यासोबत परिसरात गस्त घालत होत्या. बोरिवलीतील गोराई जेट्टी, गोराई एकजवळ गस्त घालताना त्यांना एक तरुणी मद्यधुंद अवस्थेत बसली होती. त्यामुळे त्यांनी तिची विचारणा केली असता तिने प्रिया थोरात यांना शिवीगाळ केली. तिने त्यांना नखांनी चेहर्यावर दुखापत केली होती. तिची समजूत घालून तिने पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला पोलीस उपनिरीक्षक यादव आणि पोलीस शिपाई तराळ यांनी तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने रागाच्या भरात पोलिसांना लाथ्याबुक्यांनी मारहाण केली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करुन तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी प्रिया थोरात यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध तरुणीविरुद्ध पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ करणे, नखांनी दुखापतीसह लाथ्याबुक्यांनी मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चौकशीत महिलेचे नाव रेणु रामआधार प्रजापती असे असून विरार येथील सहकारनगर, जिवदानी क्रॉस रोड, विद्या पाटील चाळीत राहते. सध्या ती एका खाजगी कंपनीत मार्केटिंगमध्ये काम करते. गुन्हा दाखल होताच तिला ४३ (५) नोटीस देऊन सोडून आल्याचे पोलिसांनी सांगितले.