पोलीस शिपायाशी धक्काबुक्की करुन हुज्जत घालण्याचा प्रयत्न
बोरिवलीतील घटना; सॅडविच विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मार्च 2025
मुंबई, – आमदारासोबत असलेल्या एका पोलीस शिपायाशी हुज्जत घालून धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रंजीत रमेश प्रधान या सॅडविच विक्रेत्याविरुद्ध बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ताब्यात घेतल्यानंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यत आले.
पोलीस शिपाई नितीन गौतम कसबे हे बोरिवली परिसरात राहतात. सोमवारी रात्री सव्वाआठ वाजता ते आमदार उपाध्याय यांच्यासोबत अंगरक्षक म्हणून शासकीय कर्तव्य बजावत होते. बोरिवलीतील एस. व्ही रोड, गोकुळ शॉपिंग सेंटरजवळ असताना तिथे रंजित प्रधान आला. तो आमदाराच्या मागेपुढे संशयास्पदरीत्या फिरत होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने त्यांच्याशी हुज्जत घालून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर नितीन कसबे यांनी त्याच्याविरुद्ध बोरिवली पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर रंजित प्रधान याच्याविरुद्ध पोलिसांनी पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की करणे, सरकारी कामात अडथळा आणणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.