बोरिवलीत बाराव्या मजल्यावरुन पडून कामागराचा मृत्यू

बाधकाम साईटच्या कॉन्ट्रक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 एप्रिल 2025
मुंबई, – बोरिवलीतील एका बांधकाम साईटवर काम करणार्‍या 27 वर्षांच्या कामगाराचा बाराव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. दिपू ऊर्फ दिपक महेश पासवान असे मृत कामगाराचे नाव असून त्याच्या मृत्यूप्रकरणी बांधकाम साईटचा कॉन्ट्रक्टर अरुणकुमार नंदेश्वर यादव याच्याविरुद्ध कस्तुबरबा मार्ग पोलिसांनी हलर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना सोमवारी दुपारी बारा वाजता बोरिवलीतील राजेंद्रनगर, अपेक्स ग्रीनवूड या बांधकाम साईटवर घडली. याच ठिकाणी पिंटू महेश पासवान हा त्याचा भाऊ दिपू आणि सिंथु यांच्यासोबत बिगारी कामगार म्हणून कामाला आहे. त्यांचे कुटुंबिय बिहारच्या सितामढी गावी राहत असून ते तिघेही नोकरीसाठी मुंबईत आले होते. सोमवारी दुपारी पिंटू हा इमारतीच्या 22 व्या मजल्यावर तर दिपू हा बाराव्या मजल्यावर काम करत होता. दुपारी बारा वाजता काम करताना त्याचा तोल गेला आणि तो बाराव्या मजल्यावरुन खाली पडला होता. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह नंतर कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात पाठविणत आला होता.

ही माहिती मिळताच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पिंटू याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी कॉन्ट्रक्टर अरुणकुमार यादव याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. प्राथमिक तपासात बांधकाम साईटवर कामगाराच्या साईटवर कामगाराच्या सुरक्षेसाठी कुठलीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. कामगारांना सेफ्टी मॅजर्न देण्यात आले नाही, सेफ्टी नेट लावण्यात आले नव्हते. कॉन्ट्रक्टर म्हणून अरुणकुमार यादवने हलगर्जीपणा केल्याचे उघडकीस आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page