बोरिवलीतील व्यावसायिकाची औषध प्राशन करुन आत्महत्या

आर्थिक वादातून मानसिक शोषण करणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 नोव्हेंबर 2025
मुंबई, – बोरिवलीतील एका व्यावसायिकाने आपल्या राहत्या घरी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चंद्रशेखर बिपीन दवे असे या 56 वर्षीय व्यावसायिकाचे नाव असून त्यांच्या आत्महत्येप्रकरणी तिघांविरुद्ध बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. योगेश अरविंद रावल, जवनिका योगेश रावल आणि अंकिता अशी या तिघांची नावे आहेत. आर्थिक वादातून या तिघांनी चंद्रशेखर यांचा मानसिक शोषण केला होता, त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईक तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या जबानीत केला आहे. चंद्रशेखरने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसायट नोटसह औषधे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

ऋषीत जगदीश दवे हे वसईचे रहिवाशी असून त्यांचे वजेश्वरी रोड, पारुल नाक्याजवळील मांडवी गावात स्वतचे सीएनजी गॅस स्टेशन आहे. चंद्रशेखर हा त्यांचा मामा बिपीन दवे यांचा मुलगा असून तो सध्या बोरिवलीतील रोशननगर, सफायर इमारतीच्या ए विंगच्या फ्लॅट क्रमांक 602 मध्ये राहत होता. योगेश हा त्याचा मेहुणा असून तो मिरारोड येि राहतो. त्याचा गायत्री ऑप्टीशियन नावाचा पार्टनरशीपमध्ये व्यवसाय आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आर्थिक वाद सुरु होते. याबाबत चंद्रशेखरने त्यांना अनेकदा सांगितले होते. 10 नोव्हेंबरला चंद्रशेखरने त्यांना फोनवरुन योगेश व त्याची पत्नी जवनिका हे दोघेही त्यांना व्यवसायात प्रचंड मानसिक त्रास देत असून त्याला पार्टनर न ठेवता नोकरी करण्यासाठी तगादा लावत आहेत.

व्यवसासाठी त्यांच्यावर जाचक अटी लादत आहेत. योगेश त्यांची चष्माचे व्यापारी वर्गात त्यांच्याविषयी बदनामी करत आहे. इतकेच नव्हे तर तो त्यांच्याकडे सतत पंधरा लाखांची मागणी करत आहे. त्यांच्या या मानसिक शोषषाला ते कंटाळून गेले आहे. त्यामुळे चंद्रशेखरने ऋषितला त्यांच्यासोबत पार्टनरशीप ऑफर केली होती. मात्र त्यात त्यांना आवड नसल्याने त्यांनी नकार दिला होता. यावेळी त्याने त्यांना काही आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनीही त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. व्यवसायातील वादामुळे चंद्रशेखर हा मानसिक तणावात होता. त्याला प्रचंड मानसिक नैराश्य आल्याचे त्यांना जाणवत होते. याच नैराश्यातून दुसर्‍या दिवशी म्हणजे मंगळवारी 11 नोव्हेंबरला चंद्रशेखरने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती.

ही माहिती त्याच्या आईकडून समजताच ऋषित दवे हे बोरिवलीतील त्याच्या राहत्या घरी आले होते. यावेळी त्यांना चंद्रशेखरने आत्महत्या करण्यापूर्वी त्यांना एक सुसायट नोट व्हॉटअप केली होती. त्याच्या राहत्या घरीही ती सुसायट नोट त्यांना सापडली. त्यात त्याने योगेश, त्याची पत्नी आणि अंकिता यांच्याकडून होणार्‍या छळाबाबत सविस्तर कथन केले होते. त्यांच्या या मानसिक शोषणाला त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. चौकशीदरम्यान चंद्रशेखरने घरातील विषारी औषध प्राशन करुन स्वतचे जीवन संपविले होते. ही माहिती मिळताच बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

घटनास्थळाहून पोलिसांनी चंद्रशेखरची सुसायट नोटसह औषधांची रिकामी पाकिट ताब्यात घेतले होते. चंद्रशेखरचे सर्व अंत्यविधी पूर्ण झाल्यानंतर ऋषित दवे यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात योगेश रावल, जवनिका आणि अंकिता या तिघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या तिघांविरुद्ध पोलिसांनी चंद्रशेखरला आर्थिक वादातून मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page