मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – चौदा वर्षांच्या अल्पवयीन मतिमंद मुलाशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी एका ५५ वर्षांच्या आरोपीस कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करणत आला असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
यातील तक्रारदार बोरिवली येथे राहत असून त्यांना चौदा वर्षांचा मुलगा आहे. तो बोरिवलीतील एका खाजगी शाळेत आठवीत शिकतो. आरोपी याच परिसरात राहत असून तो त्याच्या परिचित आहे. शनिवारी दुपारी एक वाजता आरोपीने त्याला त्याच्या घरी बोलावून त्याच्याशी लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराने तो प्रचंड घाबरला आणि घरी निघून गेला. घरी गेल्यानंतर त्याने त्याच्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. या घटनेनंतर त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात त्याने चार दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे पिडीत मुलावर अश्लील चाळे केल्याचे उघडकीस आले होते. भीतीने त्याने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. त्यानंतर त्याने शनिवारी पुन्हा त्याच्यासोबत लैगिंक अत्याचार केला होता.