चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अनैसगिंक लैगिंक अत्याचार
कांदिवलीतील घटना; २४ वर्षांच्या आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ मार्च २०२४
मुंबई, – अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर त्याच्याच परिचित आरोपीने अनैसगिंक लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कांदिवलीतील समतानगर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरुन समतानगर पोलिसांनी २४ वर्षांच्या आरोपी तरुणाविरुद्ध अनैसगिंक लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. रविवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
पिडीत मुलगा त्याच्या आई-वडिलांसोबत कांदिवलीतील समतानगर परिसरात असून तिथेच असलेल्या एका शाळेत आठवीत शिकतो. त्याचे आई-वडिल कामावर जात असल्याने तो नेहमीच एकटाच घरी राहत होता. डिसेंबर महिन्यांत त्याच्याच शेजारी राहणार्या आरोपीने त्याला अश्लील व्हिडीओ दाखविले होते. त्यानंतर त्याने त्याच्याशी अश्लील चाळे करुन अनैसगिंक लैगिंक अत्याचार केला होता. त्याचे त्याने अश्लील व्हिडीओ बनविले होते. हा प्रकार कोणालाही सांगितला तर त्याचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे बदनामीच्या भीतीने त्याने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. ही धमकी देऊन तो त्याच्यावर सतत लैगिंक अत्याचार करत होता. त्याचा त्याला प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे रविवारी त्याने ही माहिती त्याच्या पालकांना सांगितली. ही माहिती ऐकून त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. तिच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध भादवीसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी तरुण तेथून पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. लवकरच त्याला या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसाकडून सांगण्यात आले.