पंधरा वर्षांच्या मुलीवर प्रियकरासह दोन मित्रांकडून अत्याचार
मित्रांना अश्लील फोटो पाठवून लैगिंक अत्याचारास प्रवृत्त केले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ सप्टेंबर २०२४
मुंबई, – सोशल मिडीयावरुन ओळख झालेल्या एका पंधरा वर्षांच्या मुलीवर तिच्याच सतरा वर्षांच्या अल्पवयीन प्रियकराने लैगिंक अत्याचार करुन तिचे अश्लील फोटो काढून ते त्याच्या दोन मित्रांना पाठविले. या फोटोवरुन दोन्ही मित्रांनी तिला ब्लॅकयेल करुन सोशल मिडीयावर तिची बदनायीची धमकी देऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घोडपदेव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सतरा वर्षांच्या प्रियकरासह त्याच्या दोन्ही मित्रांविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत दोन्ही मित्रांना अटक करण्यात आली असून ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. अल्पवयीन प्रियकराला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. पिडीत मुलीचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन या तिघांनी तिच्यावर मे ते जुलै २०२४ दरम्यान लैगिंक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
३८ वर्षांची तक्रारदार महिला ही घोडपदेव परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिला पंधरा वर्षांची मुलगी असून ती सध्या शिक्षण घेत आहे. मे यहिन्यांत तिची फैयाज नावाच्या एका सतरा वर्षांच्या मुलाशी स्नॅपचॅट या सोशल मिडीयावरुन ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. याच दरम्यान त्याने तिला प्रपोज केले होते. तिनेही त्याला होकार दिला होता. त्यानंतर त्यांच्यात प्रेयसंबंध सुरु झाले होते. मे महिन्यांत त्याने तिला रात्रीच्या वेळेस घोडपदेव परिसातील एका इमारतीमध्ये भेटायला बोलाविले होते. तिथे गेल्यानंतर ते दोघेही इमारतीच्या अकराव्या मजल्यावर गेले होते. तिथेच त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. यावेळी त्याने तिचे मोबाईलवरुन काही अश्लील फोटो काढले होते. ते अश्लील फोटो दाखवून त्याने तिच्यावर दोन ते तीन वेळा लैगिंक अत्याचार केला होता. काही दिवसांनी त्याने तिचे फोटो अर्शद आणि आकिब नावाच्या त्याच्या दोन मित्रांना शेअर केले होते. या फोटोचा गैरफायदा घेऊन या दोघांनीही तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. तिचे अश्लील फोटो सोशल यिडीयावर व्हायरल करण्याची धयकी देऊन या दोघांनीही तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. मे ते जुलै २०२४ या कालावधीत या तिघांनी तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता.
अलीकडेच हा प्रकार मुलीकडून तिच्या आईला समजला होता. तिच्याकडून ही माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने भायखळा पोलीस ठाण्यात तिला आणून तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या तिन्ही तरुणांविरुद्ध तक्रार करुन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. या महिलेच्या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत तिन्ही आरोपीविरुद्ध ६४ (१), ६४ (२), (आय), ६५ (१), ३५१ (३), ३ (५) भारतीय न्याय सहिता सहकलय ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सतरा वर्षांच्या फैयाजसह १९ व २१ वर्षांच्या अर्शद आणि आकिब या तिघांना ताब्यात घेतले होते. फैयाज हा अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले तर इतर दोघांना अटक करुन पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तिन्ही आरोपी घोडपदेवचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.