कॉलगर्ल सर्व्हिसच्या नावाने तरुणाची ऑनलाईन फसवणुक

सर्व्हिससह पोलिसांची भीती घालून 6.10 लाख उकाळले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 मे 2025
मुंबई, – कॉलगर्ल सर्व्हिसच्या नावाने तरुणाची अज्ञात सायबर ठगांनी ऑनलाईन फसवणुक केल्याची घटना वडाळा परिसरात उघडकीस आली आहे. कॉलगर्ल सर्व्हिससह पोलिसांकडे तक्रार करुन बदनामीची धमकी देऊन या ठगाने तक्रारदार तरुणाची 6 लाख 10 हजाराची फसवणुक केली. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या सायबर ठगांचा माटुंगा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली, त्या बँक खात्याची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

23 वर्षांचा तक्रारदार तरुण मूळचा तामिळनाडूचा रहिवाशी असून सध्या वडाळा येथे राहतो. आयसीटी कॉलेजमध्ये शिक्षणासोबत तो अंधेरीतील एका खाजगी कंपनीत रिसर्च ट्रेनी म्हणून कामाला आहे. 4 मे 2025 रोजी तो गुगलवर कॉलगर्ल शोधण्यासाठी सर्च करत होता. यावेळी त्याला एका वेबसाईटवर एक मोबाईल क्रमांक सापडला होता. त्यामुळे त्याने संबंधित मोबाईलवर कॉलगर्ल (एस्कॉर्ट) सर्व्हिसबाबत विचारणा केली होती. यावेळी समोरील व्यक्तीने त्याला पाचशे रुपये देण्यास सांगितले. त्यामुळे त्याने क्यूआर स्कॅन करुन पाचशे रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर त्याने त्याला दहा तरुणीचे फोटो पाठविले होते.

ते सर्व फोटो 24 तासांत आपोआप डिलीट झाले होते. त्यापूर्वीच त्याने एका तरुणीची निवड केली होती. त्यानंतर या व्यक्तीने ती कॉलगर्ल ड्राव्हरसोबत तिथे येईल. त्यासाठी त्याने तीन हजार रुपये, सिक्युरिटी डिपॉझिटसह मुलीच्या बाजूने पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्याने त्याला दोन वेळा 32 हजार 520 रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर या व्यक्तीने त्याच्याकडे प्रोसेसिंग फी म्हणून 51 हजार 520 रुपये जमा करण्यास सांगितले. त्यामुळे त्याने ती रक्कम त्याने दिलेल्या बँक खात्यात जमा केले होते.

दुसर्‍या दिवशी या व्यक्तीने पोलीस पडताळीसाठी त्याच्याकडे 99 हजार 999 रुपये तसेच जीएसटीसाठी 1 लाख 9 हजार 500 रुपये देण्यास सांगितले. त्याने ही रक्कम देण्यास नकार देताच त्याने त्याच्याविरुदध पोलिसांकडे तक्रार करुन त्याची बदनामीची धमकी दिली होती. बदनामीच्या भीतीपोट त्याने त्याला टप्याटप्याने संबंधित रक्कम पाठवून दिली होती. अशा प्रकारे त्याने संबंधित व्यक्तीला 6 एप्रिल ते 9 एप्रिल 2025 या कालावधीत कॉलगर्ल सर्व्हिससाठी खाते पडताळणी प्रक्रिया, विमा, पोलीस पडताळणी, प्रोसेसिंग फी आणि जीएसटीच्या नावाने 6 लाख 10 हजार 538 रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र त्याने कॉलगर्ल सर्व्हिससाठी कुठल्याही तरुणीला पाठविले नाही. त्यामुळे त्याने त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्याने पैसे पाठवितो असे सांगून त्याला पैसे पाठविले नाही.

काही दिवसांनी त्याच्या मॅनेजरने त्याला फोन करुन पैशांसाइी त्याला आधी 95 हजार 560 रुपये भरावे लागतील. ही रक्कम भरल्यानंतर त्याची रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा होईल असे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने पैसे भरण्यास नकार दिला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्याने माटुंगा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page