मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ मार्च २०२४
मुंबई, – कारसाठी घेतलेल्या सुमारे पावणेबारा लाखांचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वयोवृद्धाच्या तक्रारीवरुन नवघर पोलिसांनी अक्षय संतोष सुतार या शोरुमच्या मालकाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
६० वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार मुलुंड येथे राहत असून ते एका खाजगी कंपनीत निवृत्त झाले आहेत. त्यांना एक कार खरेदी करायची होती, यावेळी त्यांच्या चालकाने त्यांची अक्षय सुतारशी ओळख करुन दिली होती. अक्षयचे युनिक मोटर्स नावाचे एक कार शोरुम असून तो त्यांना पंधरा दिवसांत कार डिलीव्हरी करुन देईल असे सांगितले. त्यामुळे फेब्रुवारी २०२४ त्यांनी अक्षयची भेट घेऊन नवीन कारबाबतसांगितले होते. यावेळी त्याने त्यांना पंधरा दिवसांत मारुती कंपनीची ऍटिंगा सीएनजी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्याने त्यांच्याकडून पावणेबारा लाख रुपये घेतले होते. मात्र पंधरा दिवसांत त्याने कारची डिलीव्हरी केली होती. त्यामुळे ते अक्षयच्या मुलुंड येथील शोरुममध्ये गेले होते. तिथे त्यांना त्याचे शोरुम बंद असल्याचे दिसून आले. चौकशीअंती अक्षयने त्यांच्यासह इतर काही लोकांना पंधरा दिवसांत कार देतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले होते, मात्र कोणालाही कारची डिलीव्हरी न करता त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात त्याने नवघर पोलिसांना घडलेला प्रकार अक्षय सुतारविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी कारसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. अक्षय हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.