एक कोटी रुपयांच्या ड्रग्जसहीत तिघांना अटक

डोंगरी पोलिसांची कारवाई; चरस-एमडी जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ मे २०२४
मुंबई, – सुमारे एक कोटी रुपयांच्या ड्रग्जसहीत तिघांना डोंगरी पोलिसांनी अटक केली. श्रीकांत मधुकर धनू, नसीम सलीम शेख आणि मेहबूब मोहम्मद युसूफ अन्सारी अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चरससह एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तीन दिवसांपूर्वी डोंगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय जाधव, सहाय्यक फौजदार मुल्ला, पोलीस हवालदार मिसाळ, पोलीस शिपाई करपाते, तडवी, सुरवाडे आदी पथक परिसरात गस्त घालत होते. सायंकाळी सहा वाजता सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळील नवरोजी हिल रोड क्रमांक ११, बीआयटी चाळीजवळ एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत होता. त्यामुळे या पथकाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना चरसचा साठा सापडला. या कारवाईत पोलिसांनी २ किलो ८८३ ग्रॅम वजनाचा चरस जप्त केला असून त्याची सुमारे ९१ लाख रुपये आहे. चौकशीदरम्यान त्याचे नाव श्रीकांत धनू असल्याचे उघडकीस आले. तो माहीम कॉजवे दर्यासारंग सोसायटीमध्ये राहत असून डोंगरी परिसरात चरसची डिलीव्हरी करण्यासाठी आला होता.

ही कारवाई सुरु असताना गुरुवारी मेहबूब अन्सारी आणि नसीम शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी आठ लाखांचा ४० ग्रॅम एमडी ड्रग्जसहीत दोन मोबाईल असा साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तेदोघेही डोंगरीच्या सेंट जोसेफ स्कूलसमोर एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आले होते. मात्र त्यापूर्वीच या दोघांना पोलिसांनी अटक केली. या तिघांविरुद्ध नंतर दोन स्वतंत्र एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हा दाखल होताच त्यांना अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले. याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहै. या तिघांना ते चरस आणि एमडी ड्रग्ज कोणी दिले. त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page