मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 एप्रिल 2025
मुंबई, – युनिफार्म नसता तर येथेच तुमच्या दोघांना गाडून टाकले असते, तुम्हाला युनिफॉर्मची मस्ती असे बोलून कर्तव्य बजाविणार्या दोन वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालून दुखापत करण्यात आल्याची घटना कांदिवलीतील चारकोप परिसरात घडली. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध चारकोप पोलिसांनी पोलिसांना दुखापत करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्हयांत शिवानंद हरिश्चंद्र चौहाण याला पोलिसांनी अटक केली तर त्याचा दुसरा सहकारी प्रविण चौहाण हा पळून गेला. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
मंदार मधुकर जाधव हे कांदिवलीतील चारकोप, सेक्टर आठमध्ये राहत असून सध्या कांदिवली वाहतूक विभागात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी दुपारी अडीच वाजता ते त्यांचा सहकारी पाटील याच्यासोबत कांदिवलीतील चारकोप, अंबामाता मंदिराजवळील सेक्टर सहा, गणेश चौकाकडे जाणार्या रस्त्यावर कर्तव्य बजावत होते. यावेळी तेथून स्कूटीवरुन जाणार्या प्रविण आणि शिवानंद यांना त्यांनी वाहतुक नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी थांबवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली होती. त्याचा रागातून या दोघांनी मंदार जाधव यांच्या स्कूटीच्या चावीने हल्ला करुन दुखापत केली होती. त्यांना शिवीगाळ करुन त्यांच्या युनिफॉर्मबाबत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
ही माहिती समजताच चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी प्रविण तेथून पळून गेला तर शिवानंदला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला सायंकाळी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रविण हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.