देशभरात 1818 लिंकवरुन छावा चित्रपट व्हायरल

कॉॅपीराईट कायद्यांचे उल्लघंनप्रकरणी गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 मार्च 2025
मुंबई, – देशभरात 1818 लिंकवरुन बहुचर्चित छावा चित्रपट प्रदर्शित करुन कॉपीराईट कायद्यांचे उल्लघंन केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास दक्षिण प्रादेशिक सायबर सेलकडे सोपविण्यात आला असून ही लिंक कोठून व्हायरल झाली याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांत काही लिंकवर अपलोड करण्यात आला होता. त्यामुळे चित्रपटाच्या वितरणावर प्रचंड परिणाम झाल्याचा आरोप झाला होता.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत असलेला बहुचर्चित छावा चित्रपट 14 फेब्रुवारीला देश-विदेशात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला सुरुवातीपासून प्रेक्षकांनी भरुभरुन प्रतिसाद दिला आहे. चालू वर्षांत 500 कोटीच्या क्लबमध्ये जाणारा छावा हा पहिलाच चित्रपट ठरला आहेत. मात्र हा चित्रपट प्रदर्शि झाल्यानंतर अवघ्या काही तासांत हा चित्रपट विविध लिंकवर अपलोड झाला होता. आतापर्यंत देशभरात 1818 लिंकवर हा चित्रपट विविध डिजीटल प्लॅटफॉर्मवर अनधिकृतपणे अपलोड झाल्याचे उघडकीस आले आहे. अज्ञात व्यक्तीने छावा चित्रपट बेकायदेशीरपणे उपलब्ध करुन या चित्रपटाची इंटरनेट लिंक्सच्या माध्यमातून सोशल मिडीयावर अपलोड केल्याचे त्यांच्या तपासात उघडकीस आले होते. अशा प्रकारे बेकायदेशीर चित्रपट अपलोड करुन कॉपीराईट कायद्याचे उल्लघंन केले. त्याचा या चित्रपटाच्या वितरणावर परिणाम होऊन कंपनीला आर्थिक नुकसान सोसावे लागले होते.

हा प्रकार ऑगस्ट इंटरटेनमेंट प्राव्हेट लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी- सीईओ रजत राहुल हक्सर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची या अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर रजत हक्सर यांच्या तक्रारीवरुन दक्षिण प्रादेशिक विभागात अज्ञात व्यक्तीविरुद्ध कॉपीराईट कायद्याचे उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

रजत हक्सर यांच्या तक्रारीनुसार, मॅडॉक फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने त्यांच्या कंपनीला पायरसी विरोधी एजन्सी म्हणून नियुक्त केले होते. त्यामुळे सोशल मिडीयावर हा चित्रपट अपलोड होऊ नये म्हणून या कंपनीने विशेष खबरदारी घेतली होती. तरीही देशभरात छावा चित्रपट 1818 लिंकवर अपलोड झाल्याने आता सायबर सेलकडून तपास सुरु करण्यात आला आहे. या सर्व लिंकची माहिती घेण्यात आली आहेत. या लिंकचे मालक कोण आहे, हा चित्रपट कोठून बेकायदेशीर प्राप्त करुन नंतर अपलोड करण्यात आला याची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. आगामी काळात संबंधितांवर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page