20 लाखांच्या कपड्याचा अपहारप्रकरणी व्यापार्‍याला अटक

फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सहआरोपी महिलेचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2026
मुंबई, – रेडीमेड कपडे बनविण्यासाठी दिलेल्या सुमारे 20 लाख रुपयांच्या कपड्याचा अपहार करुन एका कापड व्यापार्‍याची फसवणुक केल्याप्रकरणी अखिलेश श्रीमणीकांत झा या व्यापाला वनराई पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत निशा झा ही महिला सहआरोपी असून तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोघांवर कपड्याचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे. पोलीस कोठडीनंतर अखिलेश झाला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

जितेंद्र लालचंद नावानी हे कापड व्यापारी असून त्यांची एक खाजगी कंपनी आहे. याच कंपनीत ते संचालक म्हणून काम करत असून कंपनीचे कार्यालय गोरेगाव येथील शर्मा इंडस्ट्रियल इस्टेट, संत भवनात आहे. त्यांची कंपनीत विविध जॉब वर्कर-टेलर आदींना कच्चे कपडे देऊन त्यांच्याकडून रेडीमेड कपडे बनवून घेते. त्यासाठी त्यांना मेकींग चार्जेस दिले जाते. या जॉब वर्करमध्ये रमया अपिअरर्स नावाच्या एका कंपनीचा समावेश असून त्याचे संचालक निशा आणि विश्वनाथ झा आहेत. गेल्या आठ महिन्यांत त्यांची कंपनी त्यांना रेडीमेड कपड्यासाठी कच्चे कपडे देते. त्यासाठी कंपनीकडून त्यांना वेळोवेळी मोबदला दिला आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत त्यांच्या कंपनीने निशा आणि विश्वनाथ याां 11 हजार 101 मीटर कापड रेडीमेड कपडे बनविण्यासाठी दिले होते. मात्र बरेच दिवस उलटूनही त्यांनी कपडे बनवून दिले नव्हते. सतत विचारणा केल्यानंतर त्यांनी काही कपडे बनवून दिले, मात्र उर्वरित 20 लाख 32 हजार 900 रुपयांचे कपडे दिले नाही. या कपड्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी दुसर्‍या व्यक्तीला कपडे बनविण्यासाठ दिल्याचे सांगून त्यांच्याकडून आणखीन काही दिवसांची मुदत मागून घेतले होते.

मात्र त्यांनी दिलेल्या मुदतीत कपडे बनवून दिले नाही. नंतर त्यांनी कपडे बनवून देणार नाही, तुम्हाला काय करायचे आहे ते करा अशी धमकी देण्यास सुरुवात केली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांचे कॉल घेणे बंद केले होते, त्यांचे कॉल ब्लॉक केले होते. निशा आणि अखिलेश झा यांच्याकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वनराई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी 20 लाख 32 हजार रुपयांच्या कपड्याचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना अखिलेश झा याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page