मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ सप्टेंबर २०२४
मुंबई, – सोन्याचे दागिन्यांचे सुमारे ६८ लाख रुपयांची कॅश घेऊन कामगारांचे पलायन केल्याची घटना झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी रमेश गंगाराम वेद या कामगाराविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. रमेश हा मूळचा राजस्थानचा रहिवाशी असून तो त्याच्या गावी पळून गेल्याची शक्यता आहे. त्याच्या अटकेसाठी एक टिम राजस्थानला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजेश चंद्रकांत चौक्सी हे गुजरातच्या अहमदाबादचे रहिवाशी आहे. ते ज्वेलर्स व्यापारी असून त्यांचा होलसेलमध्ये सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी झव्हेरी बाजार येथील शेख मेमन स्ट्रिट, एम. ए ट्रेडर्सचे मालक महेंद्र जैन यांना ६८ लाख रुपयांचे दागिने दिले होते. या दागिन्यांचे पेमेंट घेण्यासाठी त्यांनी त्यांचा कामगार रमेश वेद याला तिथे पाठविले होते. १२ ऑगस्टला त्याने महेंद्र जैन यांच्याकडून दागिन्यांचे ६८ लाख रुपयांची कॅश घेतली होती. मात्र ही कॅश राजेश चौक्शी यांना न देताच तो पळून गेला होता. त्यांनी त्याला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. ६८ लाखांचा अपहार करुन रमेशने त्यांची आर्थिक् फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी रमेशविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी रमेशविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या कामगाराचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.