तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोघांकडून लैगिंक अत्याचार
तरुणाला अटक तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 मार्च 2025
मुंबई, – एकत्र गेम खेळू असे सांगून एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित दोघांनी लैगिंक अत्याचार केला. त्यात एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या दोघांविरुद्ध आरसीएफ पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत 19 वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली तर चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आहे.
49 वर्षांची तक्रारदार महिला ही चेंबूर परिसरात राहत असून पिडीत तेरा वर्षांची तिची नात आहे. याच परिसरात दोन्ही आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. 18 मार्चला तिला 19 वर्षांच्या आरोपीने गेम खेळण्यासाठी बोलाविले होते. रात्री उशिरा तीन वाजता तो तिला घेऊन जवळच्या डोंगरावर घेऊन आला. तिथे त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर तिच्या भावाला जिवे मारण्याची त्याने तिला धमकी दिली होती.
त्याच दिवशी दुपारी दुसर्या अल्पवयीन मुलाने तिच्या घरातील बाथरुममध्ये तिचे तोंड दाबून तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र चार दिवसांनी तिने घडलेला प्रकार तिच्या आजीला सांगितला. तिच्याकडून ही माहिती समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने आरसीएफ पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा ादखल होताच आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यांनतर त्याला नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.