निवासी इमारतीमध्ये चालणार्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
वयोवृद्ध महिलेविरुद्ध गुन्हा तर मुलीसह दोघींची सुटका
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 ऑगस्ट 2025
मुंबई, – चेंबूर परिसरातील एका निवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये चालणार्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका 60 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता, पिटा आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कारवाईनंतर या वयोवृद्ध महिलेला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. यावेळी पोलिसांनी तिच्या घरातून एका पंधरा वर्पांच्या अल्पवयीन मुलीसह महिलेची सुटका केली आहे. मेडीकलनंतर या मुलीला डोंगरीतील बालसुधारगृहात तर महिलेला गोवंडीतील देवनार महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबई पोलिसांनी ऑनलाईन चालणार्या सेक्स रॅकेटच्या विरोधात धडक कारवाई करण्यास सुरुवात केली होती. या मोहीमेतर्गत आतापर्यंत मुंबई शहरात चालणार्या अनेक सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करुन पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक करुन त्यांच्या तावडीतून अल्पवयीन मुलीसह तरुणी आणि महिलांची सुटका केली होती. ही कारवाई सुरु असतानाच चेंबूर परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये एक वयोवृद्ध महिला राहत असून ही महिला तिच्या राहत्या घरी काही अल्पवयीन मुलीसह महिलांच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी संबंधित वयोवृद्ध महिलेचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन तिला बोगस ग्राहकाच्या मदतीने संपर्क साधण्यात आला होता.
यावेळी या बोगस ग्राहकाने तिच्याकडे काही अल्पवयीन मुलीसह महिलांची मागणी केली होती. फोनवरच त्यांच्यात सविस्तर चर्चा झाली होती. ठरल्याप्रमाणे बोगस ग्राहकाला तिने तिच्या चेंबूर येथील राहत्या घरी बोलाविले होते. त्यामुळे बोगस ग्राहक शनिवारी सांयकाळी तिच्या घरी गेला होता. यावेळी त्यांच्यात आर्थिक व्यवहार सुरु असताना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी तिथे छापा टाकला होता. घटनास्थळाहून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीसह महिलेची सुटका केली. त्यांच्या चौकशीत आरोपी महिला तिच्या राहत्या घरातून सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले.
तपासात आलेल्या या माहितीनंतर वयोवृद्ध महिलेविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिच्यासह दोन्ही बळीतांना आरसीएफ पोलिसांकडे सोपविण्यात आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर आरोपी महिलेला नोटीस देऊन सोडून देण्यात आले. सुटका केलेल्या दोघींना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना बालसुधारगृहासह महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते.