नऊ वर्षांच्या मुलावर चौदा वर्षांच्या मुलांकडून अत्याचार
गुन्हा दाखल होताच दोन्ही मुलांची डोंगरी सुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 एपिल 2025
मुंबई, – नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलावर त्याच्याच शेजारी राहणार्या चौदा वर्षांच्या दोन मुलांनी अनैसगिंक लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कुर्ला परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच या दोन्ही मुलांना चुन्नाभट्टी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी मुले अल्पवयीन असल्याने पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध अनैसगिक लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
27 वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत कुर्ला परिसरात राहते. तिला नऊ वर्षांचा मुलगा असून याच परिसरातील एका शाळेत तो शिकतो. चौदा वर्षांचे दोन्ही अल्पवयीन मुले याच परिसरात राहत असल्याने ते एकमेकांच्या परिचित आहेत. सोमवारी 21 एप्रिलला सायंकाळी साडेसहा वाजता बळीत मुलाला दोन्ही मुलांनी त्यांच्या घरी आणले होते. तिथे त्याने त्याचे कपडे काढून त्याच्याशी अश्लील लगट करण्याचा प्रयत्न केला होता. काही वेळानंतर या दोघांनी त्याच्याशी अनैसगिंक लैगिंक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकी दिली होती. भीतीपोटी त्याने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
बुधवारी हा प्रकार मुलाकडून त्याच्या आईला समजातच तिने चुन्नाभट्टी पोलिसांना सांगून दोन्ही अल्पवयीन मुलांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अनैसगिंक लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच चौदा वर्षांच्या दोन्ही मुलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ते दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांना नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. बळीत मुलाला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात ाअले असून तिथे त्याची मेडीकल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.