कोल्डप्लेस कॉन्सेटचे पासेस मेल करण्याची बतावणी करुन गंडा

चुन्नाभट्टी येथील घटना; तरुणाची २.१७ लाखांची फसवणुक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – कोल्डप्लेस कॉन्सेटचे पासेस ऑनलाईन मेल करण्याची बतावणी करुन एका तरुणाची अज्ञात सायबर ठगाने २ लाख १७ हजाराची फसवणुक केल्याची घटना चुन्नाभट्टी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या तरुणाच्या तक्रार अर्जावरुन चुन्नाभट्टी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

१८ वर्षांचा विरेंद्र दिनेश जैन हा शिक्षण घेत असून सध्या त्याच्या कुटुंबियांसोबत चुन्नाभट्टी परिसरात राहतो. त्याच्या वडिलांचा स्वतचा व्यवसाय आहे. २४ सप्टेंबरला तो त्याच्या घरी होता. यावेळी तो सोशल साईटवर जानेवारी २०२५ रोजी नवी मुंबईत होणार्‍या कोल्डप्ले कॉन्सेटचे ऑनलाईन तिकिट उपलब्ध आहेत का हे पाहत होता. यावेळी त्याला गुगलवर एका व्यक्तीचा मोबाईल क्रमाक सापडला. त्याने त्या मोबाईलवर संपर्क साधून त्याच्याकडे कोल्डप्ले कॉन्सेटच्या तिकिटाबाबत विचारणा केली होती. यावेळी समोरील व्यक्तीने साडेसात हजार आणि दहा हजारामध्ये तिकिट उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने स्वतसह त्याची बहिण, मैत्रिणीसह वडिलांच्या मित्रांसाठी त्याने दिलेल्या बँक खात्यात २ लाख १७ हजार ५०० रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते. यावेळी त्याने त्यांना २४ पासेस ऑनलाईन पाठविण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने पासेस पाठविले नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी ज्या मेलवरुन त्याला मॅसेज प्राप्त झाला होता. त्या मेलवरुन अनेकांना ऑनलाईन पासेस देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणुक झाल्याचे समजले.

हा प्रकार लक्षात येताच विरेंद्र जैन यांनी घडलेला प्रकार चुन्नाभट्टी पोलिसांना सांगून तिथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह स्थानिक सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांत अशाच प्रकारे अनेकांची फसवणुक झाल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांचा आर्थिक शाखेसह सायबर सेलकडून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page