मरीन ड्राईव्हवर न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धा रंगल्या

मुंबई उच्च न्यायालय कर्मचारी संघाने अंतिम सामन्यात मारली बाजी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 एप्रिल 2025
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्र पुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त भव्य *टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२५*या मुंबई जिल्हा न्यायालय कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे पोलीस जिमखाना मैदान मरीन ड्राईव्ह येथे सोमवारी आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत मुंबई उच्च न्यायालय कर्मचारी संघाने अंतिम सामन्यात बाजी मारून मानाचा आकर्षक चषक जिंकला. तर मुंबई शहर दिवाणी न्यायालय कर्मचारी संघ हा उपविजेता ठरला.

स्पर्धेत शहर दिवाणी न्यायालय व सत्र न्यायालय-मुंबई, मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय-मुंबई, लघुवाद न्यायालय-मुंबई आणि औद्योगिक व कामगार न्यायालय- मुंबई अशा चार संघांचे बृहन्मुंबईतील आठ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विजेता संघ, उपविजेता संघ तर संपूर्ण स्पर्धेत एक उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निवडलेल्यांचा सत्कार पारितोषिके देऊन येत्या २३ एप्रिल रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात करण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन न्यायमूर्ती मकरंद कर्णिक,न्यायमूर्ती सारंग कोतवाल, न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी केले, या न्यायमूर्तींचे स्वागत मुंबई जिल्हा न्यायालय कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष , रवी पवार, चंद्रकांत बनकर, शरद साळवे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन केले. या कार्यक्रमाला विशेष आमंत्रित म्हणून महाराष्ट्र राज्य न्यायालयिन कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिगंबर निकम हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शेलार यांनी केले. याप्रसंगी उपरोक्त चारही न्यायालयाचे वरिष्ठ अधिकारी/ कर्मचारी श्रीमती नीलम शाहीर, अतुल राणे, दत्ता पासलकर , किरण कांबळे , सचिन कांबळे, राजू खिलारे , रत्नाकर भोळे ,निलेश तायडे, अमोल साळवे,निलेश भुजबळ ,प्रशांत भोसले इत्यादी उपस्थित होते.

क्रिकेट म्हटलं की नाही म्हणता येत नाही. मी नियोजित कार्यक्रम रद्द करून या आपल्या क्रिकेट स्पर्धेस हजर राहिलो. निरोगी,आरोग्यदायी राहण्यासाठी सतत खेळत राहावे असा संदेश उपस्थित क्रिकेट रसिकांना न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी याप्रसंगी दिला.

हिरव्यागार मैदानामुळे मनात सतत उत्साह संचारतो. खेळातून कृतज्ञता अधोरेखित होते. सकारात्मक विचार मनाला ऊर्जा देतात. उभारी देतात, असे मत न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी व्यक्त केले. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक विनोदाने म्हणाले येथे जिमखान्यावर आयपीएल क्रिकेट सारखे वातावरण आहे. छान आहे. आजच नाही तर जेंव्हा जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा खेळत रहा असेही सुतोवाच केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page