मध्यप्रदेशातून आणलेल्या घातक शस्त्रांसह दोघांना अटक

दोन्ही आरोपींकडून दोन पिस्तूल, मॅगझीन, काडतुसे जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 नोव्हेंबर 2025
मुंबई, – मध्यप्रदेशातून मुंबई शहरात विक्रीसाठी आलेल्या घातक शस्त्रांसह दोघांना शनिवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. आकाश राजू उडके आणि ऋषि संतोष तिरकी अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मध्यप्रदेशचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याची मुंबई शहरात विक्री होत असल्याने अशा शस्त्रांची तस्करी करणार्‍या आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु सआतना विलेपार्ले येथे काहीजण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट आठच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने विलेपार्ले येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, प्रस्तावित हनुमान रोड मेट्रो स्टेशन ब्रिजजवळील दक्षिण वाहिनीवर साध्या वेशात पाळत ठेवली होती.

शनिवारी सकाळी तिथे दोन तरुण आले होते, त्यांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना दोन देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि सहा जिवंत काडतुसे सापडले. तपासात त्यांनी ते दोघेही तिथे घातक शस्त्रांची विक्रीसाठी आल्याचे सांगितले.

चौकशीत त्यांची नावे आकाश उडके आणि ऋषि तिरकी असून ते दोघेही मध्यप्रदेशच्या भोपाळचे रहिवाशी आहे. यातील आकाश हा मजुरीचे काम करतो तर ऋषि हा वेटर म्हणून कामाला आहे. मुंबई घातक शस्त्रांचा प्रचंड मागणी असल्याने ते दोघेही शस्त्रांची विक्रीसाठी मध्यप्रदेशातून मुंबईत आले होते. मात्र शस्त्रांची विक्री करण्यापूर्वीच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच गुन्ह्यांत नंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना ते शस्त्रे कोणी दिले, ते शस्त्रे कोणाला देणार होते, यापूर्वीही त्यांनी घातक शस्त्रांची विक्री केली आहे का, या शस्त्रांचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला आहे का किंवा वापर होणार होता का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page