डॉलरच्या नावाने गंडा घालणार्‍या टोळीच्या म्होरक्याला अटक

बंगलोर येथे गुन्हे शाखेची कारवाई; मुंबई-दिल्ली-चेन्नईत गुन्हे दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ मार्च २०२४
मुंबई, – डॉलरच्या नावाने अनेकांना गंडा घालणार्‍या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर पळून गेलेल्या म्होरक्याला अटक करण्यात अखेर गुन्हे शाखेला यश आले आहे. कृष्णकुमार रामनिवास शर्मा ऊर्फ कृष्णा असे या मुख्य आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने गुरुवार २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी पोलिसांनी माजिद अब्दुल मलिक खान ऊर्फ मन्नू, मयंक प्रदीप शर्मा ऊर्फ लड्डू आणि आकाश द्वारकाप्रसाद अग्रवाल ऊर्फ कब्बू याा तिघांना पोलिसांनी अटक केली होती. या तिघांचा कृष्णनकुमार हा मुख्य सहकारी असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह दिल्ली आणि चेन्नईतील विविध पोलीस ठाण्यात अपहारासह फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे. डॉलरच्या नावाने फसवणुक करणारी ही सराईत टोळी असून कृष्णनकुमारच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

परेश भॅवरलाल परमार यांचा फॉरेक्सचा व्यवसाय असून त्याची एक खाजगी कंपनी आहे. ही कंपनी विदेशी चलन एक्सचेंजचा व्यवसाय करते. फेब्रुवारी महिन्यांत त्यांना त्यांच्या एका मित्राने कृष्णनकुमारविषयी माहिती सांगून त्याला विदेशी चलनाची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचे त्याच्याशी बोलणे झाले होते. त्याने त्यांना सांताक्रुज येथील हयात हॉटेलमध्ये बोलाविले होते. तिथे त्यांची भेट झाली होती. त्याने त्यांना युएस डॉलरची गरज असल्याचे सांगून एका रुममध्ये आणले. रुममध्ये अन्य दोन तरुण होते. यावेळी कृष्णनकुमारने तो बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून काम असून पूर्वी त्याचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय होता. याच हॉटेलच्या लॉबीमध्ये अक्षयकुमारचे शूटींग सुरु आहे. अक्षयकुमारला भेटायचे असल्याने त्याने त्यांना तिथे येण्याची विनंती केली होती. त्याला विदेशी चलनाची गरज भासत असल्याने त्यातून त्यांना चांगला फायदा होईल असे सांगून त्याने त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने त्यांच्याकडून २१ लाख ५० हजार रुपयांचे २५ हजार युएस डॉलर घेतले. त्यांचा सहाय्यक आवश्यक कागदपत्रे घेऊन येईल आणि नंतर त्यांना पेमेंट करतो असे सांगून तो रुमबाहेर निघून गेला आणि परत आलाच नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी वाकोला पोलिसांना ही माहिती दिली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच वाकोला पोलिसांसह गुन्हे शाखेने पळून गेलेल्या आरोपींचा शोध केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई, प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे व त्यांच्या पथकाने माजिद, मयंक आणि आकाश या तिघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत डॉलरच्या नावाने गंडा घालणारी ही एक आंतरराज्य टोळी असून या टोळीचा म्होरक्या कृष्णा ऊर्फ कृष्णनकुमार असल्याचे उघडकीस आले.

या तिघांच्या अटकेनंतर तो पळून गेला होता. कृष्णनकुमार हा सतत नाव आणि जागा बदलून राहत होता. त्याला पंचतांराकित हॉटेलमध्ये राहायला आवडत असल्याने पोलिसांनी अशा हॉटेलची माहिती काढून त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तो कर्नाटक येथील बंगलोर शहरातील ताज वेस्टएंट हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई, प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार प्रजापती, मधुकर धुतराज, राहुल प्रभू, संग्राम पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास मोरे, अरविंद मोरे, पोलीस हवालदार शिरसाट, यादव, किणी, काकडे, कुरकूटे, सावंत, कांबळे, पोलीस शिपाई रहेरे, सटाले, महिला पोलीस शिपाई गायकवाड, भिताडे, पोलीस शिपाई बिडवे, साळवे यांनी तिथे सापळा लावून कृष्णनकुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कृष्णनविरुद्ध आंबोली, वाकोला, विमानतळ तर दिल्लीच्या कनॉट प्लेस व चेन्नईच्या ई३ टेनामेंट पोलीस ठाण्यात पाचहून अधिक फसवणुकीसह अपहाराच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीने मुंबईसह देशभरातील अनेक व्यावसायिकाची विविध कारणे सांगून फसवणुक केली आहे. त्यामुळे त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page