मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ एका २९ वर्षांच्या तरुणीवर दोन अज्ञात तरुणाने आळीपाळीने सामूहिक लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध सामूहिक लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या दोन्ही आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
पिडीत तरुणी ही फोर्ट येथील टुसेंट जॉर्ज हॉस्पिटलसमोरील गल्लीत राहते. २२ सप्टेंबरला रात्री बारा वाजता ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ बसली होती. यावेळी तिथे दोन तरुण आले आणि त्यांनी तिला उचलून जवळच असलेल्या टॅक्सीच्या मागील फुटपाथवर आणले. तिने आरडाओरड करु नये म्हणून एका व्यक्तीने तिच्या तोंड दाबून ठेवले तर दुसर्याने तिचे अंगावरील सर्व कपडे काढून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्यानतर दुसर्या तरुणानेही तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. रात्री तीन वाजता ते दोघेही पळून गेले होते. बदनामीच्या भीतीने घडलेला प्रकार तिने कोणालाही सांगितला नाही. अलीकडेच ती नवी मुंबईतील मीनाबाई ठाकरे हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. तिथेच तिची मेडीकल करण्यात आली होती. या मेडीकलमध्ये तिच्यावर सामूहिक लैगिंक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे ही माहिती नंतर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांना देण्यात आली. या माहितीनंतर पोलिसांनी पिडीत तरुणीची जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर दोन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांी ६४ (१), ७०, ३५१ (३), भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहे.
२२ सप्टेंबरला रात्री ही घटना घडली होती. त्यानंतर तब्बल दहा दिवसांनी पिडीत तरुणीने तिच्यावर सामूहिक लैगिंक अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसाकडे केली आहे. त्यामुळे तिच्या तक्रारीची शहानिशा करण्याचे काम सुरु आहे. दुसरीकडे परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पिडीत तरुणीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सागितले.