ऑनलाईन फसवणुकीची एक कोटीची रक्कम फ्रिज

गेल्या २४ तासांची सायबर सेल पोलिसांची कामगिरी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – विविध कारण सांगून ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सुमारे एक कोटीची रक्कम फ्रिज करण्यात मुंबई पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. गेल्या २४ तासांत तक्रार प्राप्त होताच सायबर सेल विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, निवृत्ती बावस्कर यांनी ही रक्कम फ्रिज केल्याने संबंधित पोलीस अधिकार्‍यांचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी कौतुक केले आहे. फसवणुकीची ही रक्कम लवकरच संबंधित व्यक्तींच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे अशा प्रकारे चालू वर्षांत सायबर सेल पोलिसांनी आतापर्यंत ११४ कोटीची रक्कम फ्रिज करण्यात यश मिळविले आहे.

गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांच्या लक्षणीय वाढ झाली आहे. अशा गुन्ह्यांचा आळा घालण्यसाठी सायबर सेल पोलिसांकडून सतत जनजागृती केली जाते. जाहिरातीद्वारे अशा सायबर ठगांपासून सावध राहावे, कोणाशीही बँक खात्यासह ओटीपी शेअर करु नका, कुठलीही लिंक ओपन करु नका, या लिंकवर वैयक्तिक माहितीसह बँक खात्यात डिटेल्स अपलोड करु नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येते. तसेच सायबर ठगांकडून फसवणुक झालेल्या तक्रारदारांसाठी सायबर सेल पोलिसांनी १९३० ही सायबर हेल्पलाईन क्रमांक सुरु केला होता. फसवणुकीनंतर सायबर हेल्प लाईन संपर्क साधल्यानंतर अनेकदा सायबर पोलिसांनी फसवणुकीची रक्कम परत मिळविण्यात यश मिळविले आहे. गेल्या २४ तासांत अशाच प्रकारे काही लोकांची सायबर ठगांनी ऑनलाईन फसवणुक केली होती. याबाबत तक्रारदारांनी सायबर हेल्पलाईनसह स्थानिक सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत ज्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली आहे. त्या बँक खात्याची माहिती काढून संबंधित नोडल बँक अधिकार्‍यांना संपर्क साधला होता. या बँक खात्याचे सर्व व्यवहार थांबविण्याची विनंती केली होती. त्यामुळेच गेल्या २४ तासांत ऑनलाईन फसवणुकीची १ कोटी १ लाख ५८ हजार ७२७ रुपयांची रक्कम जप्त करण्यात सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. या कामगिरीबाबत सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, निवृत्ती बावस्कर यांचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी कौतुक केले होते. चालू वर्षांत सायबर सेल पोलिसांनी ११४ कोटीची रक्कम जप्त केली होती. ही रक्कम नंतर संबंधित तक्रारदाराच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. सायबर सेल पोलिसांच्या या कामगिरीचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी कौतुक केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page