आयपीएस सागर राम करेन तुमचे बँक खाते रिकामी 

0
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ फेब्रुवारी २०२४
मुंबई, –  आयपीएस सागर राम नावाची भीती दाखवून सायबर ठगाने व्यावसायिकाच्या बँक खात्यातील ३ लाख ९ हजार रुपये वळते केले. सुरुवातीला कारवाईची भीती दाखवून स्काईप अप्स डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर सीबीआयचे बनावट पत्र पाठवून मुलीच्या खात्यातील देखील पैसे पाठवण्यास भाग पाडले. हा प्रकार संशयास्पद वाटल्यावर व्यावसायिकाने मदतीसाठी मुंबई पोलिसांना फोन केला. त्यानंतर कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. व्यावसायिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
बोरिवली येथे व्यावसायिक राहतात. ते मुंबई महापालिकेला प्लम्बिंग कामासाठी लागणारे मनुष्यबळ पुरवण्याचे काम करतात. १६ फेब्रुवारीला ते कामानिमित्त कांदिवली येथे गेले होते. तेव्हा त्याच्या मोबाईलवर एकाचा फोन आला. फोन करणाऱ्याने तो ट्राय ऑथॉरिटी मधून बोलत असल्याचे भासवले. तुम्ही तुमच्या सिम कार्डचा गैर वापर करत आहात असे सांगून त्याने फोन ट्रांसफर केला. फोनवर बोलणाऱ्या ठगाने त्याचे नाव सागर राम असल्याचे सांगून तो आयपीएस अधिकारी असल्याचे भासवले. आम्ही नरेश गोयल नावाच्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्या खिशात आपले आधारकार्ड मिळाले आहे. त्यामुळे तुमची चौकशी करायला लागणार असल्याची ठगाने भीती घातली.
जर चौकशी करायची नसल्यास स्काईप अप्स डाऊन लोड करावे लागेल असे त्याना सांगितले. घरी आल्यावर त्याने स्काईप अप्स डाऊन लोड केले. अप्स डाऊन लोड केल्यावर व्यावसायिकाने ठगांना त्याच्या बँक खात्याची माहिती दिली. आपण पोलीस अधिकारी आहोत, जो पर्यंत आपण फोन करत नाही तो पर्यंत कोणालाही माहिती सांगायची नाही असा दम ठगाने व्यावसायिकांना दिला. दुसऱ्या दिवशी ठगाने पुन्हा त्याना फोन केला. ठगाने त्याना स्काईप अप्सवर येण्यास सांगितले. तुमच्या विरोधात पुरावे गोळा केले जात आहे. तुमच्या लॉकर आणि खात्यात जेवढे पैसे आहेत, ते एका खात्यात ट्रान्स्फर करा असे त्याना सांगितले. खात्यात असलेले ३ लाख ९ हजार रुपये देखील एका खात्यात वर्ग करा असे त्याना सांगितले. काही वेळाने ठगाने त्याना एक पत्र पाठवले. सीबीआयचा अधिकारी असल्याचे ठगाने भासवले. तुमच्या मुलीच्या खात्यात देखील पैसे आहेत, ते देखील खात्यात पाठवा असे त्याना सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. व्यावसायिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
काय काळजी घ्याल 
जर तुम्हाला असा फसवा फोन आला. तर सुरुवातीला तुम्ही घाबरू नये. सायबर ठग हे विविध आयपीएस अधिकाऱ्याची नावे घेतील. ठग काय बोलतात हे लक्ष देऊन ऐकावे, त्यानंतर पुढील आपली प्रतिक्रिया द्यावी. ठग हे तुम्हाला अटक करू, अशी भीती घालतील. तेव्हा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांची मदत घ्यावी. कोणताही आयपीएस अधिकारी हा अप्स द्वारे चौकशी करत नाही. आणि पैसे पाठवण्यास सांगत असल्यास पैसे पाठवू नये. जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. 

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page