मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जुलै 2025
मुंबई, – कराटे प्रशिक्षणादरम्यान एका बारा वर्षांच्या अल्वयीन मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंगासह लैगिंक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच 22 वर्षांच्या कराटे प्रशिक्षकाला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
43 वर्षीय तक्रारदार महिला दादर येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिला बारा वर्षांची मुलगी असून सध्या शिक्षण घेते. शिक्षणासोबत तिला तिच्या आईने कराटेचे प्रशिक्षणासाठी जवळच्या एका व्यायाम शाळेत प्रवेश घेतला होता. तिथे आरोपी तरुण तिला कराटेचे प्रशिक्षण देत होता. अनेकदा तो तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करत होता. तिच्याशी लैगिंक अत्याचार करत होता. तिने विरोध केल्यास ती त्याच्यासोबत जबदस्तीने सदरचे अश्लील कृत्य करते असे तिला आईला सांगून तिच्या आईसोबत अश्लील चाळे करण्याची धमकी देत होता. जानेवारी ते जून या कालावधीत अनेकदा त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला तसेच तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता.
सुरुवातीला भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र कराटे प्रशिक्षकाकडून होणार्या अत्याचाराला कंटाळून तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला होता. या घटनेनंतर तिने शिवाजी पार्क पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी कराटे प्रशिक्षकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमातर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सोमवारी त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे इतर मुलींशी अश्लील चाळे केले होते का याचा पोलीस तपास करत आहेत.