तेरा वर्षांच्या मुलीवर पंधरा वर्षांच्या मुलाकडून लैगिंक अत्याचार
लग्नाच्या आमिषाने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित पंधरा वर्षांच्या मुलाने लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी मुलाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी मुलगा स्वतहून पोलीस ठाण्यात आला होता, त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याच्या पालकांकडे सोपविले आहे. त्याला लवकरच डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात येणार आहे. लग्नाच्या आमिषाने या मुलाने पिडीत मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचे तपासात उघडकीस आले आहे.
पिडीत मुलगी आणि आरोपी मुलगा हे दोघेही प्रभादेवी आणि वरळी परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. ते दोघेही शिक्षण घेत असून याच दरम्यान त्यांची मैत्री झाली आणि त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. डिसेंबर २०२३ ते ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत लग्नाच्या आमिषाने त्याने पिडीत मुलीवर त्याच्यासह तिच्या राहत्या घरात अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. गेल्या काही दिवसांपासून या मुलीच्या पोटात वेदना होऊ लागले, त्यामुळे तिला नायर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे मेडीकल केल्यानंतर ती अठरा आठवड्याची गरोदर असल्याचे उघडकीस आले. ही माहिती समजताच तिच्या आजीला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. हा प्रकार हॉस्पिटल प्रशासनाकडून समजताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी ५३ वर्षांच्या आजीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध ३७६ (२), ३७६ (एन), (२) भादवी सहकलम ६, १० पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी मुलगा स्वतहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्याच्या पालकांना ही माहिती देण्यात आली आहे. सोमवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.