मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 एप्रिल 2025
मुंबई, – बी कॉमच्या शेवटच्या वर्षांत शिक्षण घेणार्या एका 20 वर्षांच्या कॉलेज तरुणीने मंगळवारी तिच्या राहत्या इमारतीच्या टेरेसवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. जैना केतूभाई सेठीया असे या कॉलेज तरुणीचे नाव असून प्रेमभंग झाल्याने ती मानसिक तणावात होती, त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तिच्या पालकांसह दोन्ही मित्रांची जबानी नोंदवून घेतली आहे. जैनाच्या आत्महत्येने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता दादर येथील हिंदू कॉलनीतील एका चौदा मजली इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या आठव्या मजल्यावर जैना ही तिच्या कुटुंबियांसोबत राहत होती. ती एका नामांकित कॉलेजमध्ये बी कॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. गेल्या काही दिवसांपासून ती प्रचंड मानसिक तणावात होती. त्यामुळे तिला भेटायला तिचे दोन मित्र तिच्या घरी आले होते. या सर्वांनी जेवण केले आणि रात्री ते तिघेही इमारतीच्या टेरेसवर गेले होते. तिथे तिची दोन्ही मित्र समजूत घालत होते. याच दरम्यान जैनाने टेरेसवरुन उडी घेतली होती. त्यात ती दुसर्या इमारतीच्या कंपाऊंडमध्ये पडली.
ही माहिती मित्रांकडून समजताच तिच्या पालकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ही माहिती नंतर माटुंगा पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी तिला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. जैनाकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे तिच्या आत्महत्येमागील अधिकृत समजू शकले नाही. तिच्या घरातून पोलिसांनी एक डायरी जप्त केली आहे. त्यात तिने काही निराशाजनक गोष्टींचा उल्लेख केला होता. त्यावरुन ती काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे दिसून आले.
तिच्या पालकांसह मित्रांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. या जबानीतून जैनाचे एका तरुणासोबत प्रेम होते. मात्र त्याने तिला नकार देत त्याचे दुश्रसक्षर्या तरुणीसोबत प्रेम असल्याचे सांगितले होते. त्याच्या नकारानंतर ती प्रचंड नैराश्यात आली होती. त्यातून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. मात्र प्रेमभंग झाल्यामुळे जैनाने मानसिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचे बोलले जाते.