वाहतूक नियमांचे यंदाही गोविंदाकडून उल्लघंनाची मालिका सुरुच
10 हजार गोविंदावर कारवाई करुन 1.13 कोटीचा दंड ठोठावला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 ऑगस्ट 2025
मुंबई, – मुंबई वाहतूक पोलिसांकडून दिलेल्या वाहतूक नियमांचे यंदाही गोविंदाकडून उल्लघंनाची मालिका सुरुच राहिली. विविध कलमांतर्गत वाहतूक नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी शनिवारी दिवसभरात 10 हजार 51 गोविंदावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एक कोटी तेरा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या सर्वांना ई-चलन जारी करण्यात आले आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जाते.
शनिवारी दहिहंडी असल्याने मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या उत्सावाला कुठेही गालबोट लागू नये म्हणून पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली होती. त्यात वाहतूक पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या बंदोबस्तामुळे दहिहंडीचा सण सर्वत्र उत्साहात पार पडला होता. मात्र काही गोविंदा पथकासह गोविंदाकडून यंदाही वाहतूक पोलिसांचे उल्लघंन करण्यात झाले होते. सण साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही, वाहतूक नियमांचे कुठेही उल्लघंन करु नका असे सांगून काही उत्साही गोविंदाकडून या नियमांचे सर्रासपणे उल्लघंन झाल्याचे विविध ठिकाणी दिसून आले. अनेक ठिकाणी बाईक चालविताना हेल्मेट न घालणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, ट्रिपल सीट, सिग्नल तोडणे, भरवेगात गाडी चालविणे अशा प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लघंन झाले होते.
अशा 10 हजार 51 गोविंदावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडून एक कोटी तेरा लाखांचा दंड ठोठावण्यात आला. या सर्वांना ई-चलन जारी करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर काही सीसीटिव्ही फुटेजची पाहणी वाहतूक पोलिसांकडून होणार आहे. त्यामुळे हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. अन्य एका कारवाईत पोलिसांनी एका तरुणाला ड्रोन उडविल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी दोन लाखांचा ड्रोन जप्त केला आहे. मलबार हिल येथील वाळकेश्वर, जब्रेश्वर गल्लीत एक तरुण दहिहंडी सरावादरम्यान ड्रोन उडवत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. यावेळी ड्रोन उडविणार्या या तरुणाला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाखांचा ड्रोन जप्त केला आहे.
दुसरीकडे शनिवारी दहिहंडी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. विविध ठिकाणी दहिहंडी उत्साहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात राजकीय नेत्यांच्या दहिहंडीला मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. अनेक मंडळ सकाळपासून दहिहंडीसाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. दिवसभर जोरदार पाऊस असताना गोविंदा पथकाचा उत्साह काही कमी नव्हता. मात्र या उत्साहाच्या भरात काही गोविंदांकडून नेहमीप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लघंन झाले. त्यामुळे अशा गोविंदांना ई-चलनद्वारे दंड ठोठावण्यात आला आहे.