मानलेल्या बहिणीची सोशल मिडीयावर अश्लील पोस्ट करुन बदनामी
दांडियादरम्यान झालेल्या वादातून सूड घेण्यासाठी कृत्य केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 जून 2025
मुंबई, – मानलेल्या बहिणीच्या विरोधात सोशल मिडीयावर अश्लील पोस्ट करुन तिची बदनामी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच एका 47 वर्षांच्या आरोपीस दहिसर पोलिसांनी अटक केली. स्वतची अटक टाळण्याासठी त्याने व्हिपीएन नेटवर्कचा वापर केला होता. दांडियादरम्यान झालेल्या वादानंतर त्याने सूड घेण्यासाठी मानलेल्या बहिणीची बदनामी केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. या गुन्ह्यांत आरोपीला अटक झाल्याचे समजताच तक्रारदार तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला होता.
30 वर्षांची तक्रारदार तरुणी ही दहिसर परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत तिला एक अश्लील मॅसेज आला होता. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते, मात्र नंतर तिच्या मेलवर सतत अश्लील मॅसेज येत होती. या मॅसेजमध्ये आक्षेपार्ह आणि घृणास्पद मजकूर नमूद करण्यात आले. त्यात तिची प्रचंड बदनामी झाली होती. काही मजकूर तिच्या आयुष्याशी निगडीत असल्याने तिला धक्काच बसला होता. सतत येणार्या अश्लील मॅसेजनंतर तिने दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता.
तपासात आरोपीने स्वतची ओळख पटविण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतल्याचे उघडकीस आले होते. तो व्हिपीएन तंत्रज्ञानाचा वापर केला होता. जेणेकरुन त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. तरीही पोलिसांनी तपास सुरु ठेवला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी एका 47 वर्षीय आरोपीस ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्यानेच तक्रारदार महिलेला अश्लील मॅसेज पाठवून तिची बदनामी केल्याचे तपासात उघडकीस आले. ही तरुणी आणि आरोपी एकाच इमारतीमध्ये राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. तो तिला बहिण मानत होता.
गेल्या वर्षी दांडियादरम्यान त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. रात्री उशिरापर्यंत ती तिच्या मित्रांसोबत दांडिया खेळण्यासाठी जात असल्याने त्याने तिला त्यांच्यासोबत जाण्यास मनाई केली होती. याच कारणावरुन तिने त्याची चांगली खरडपट्टी काढली होती. त्याचा त्याच्या मनात प्रचंड राग होता. याच रागातून तिचा सूड घेण्यासाठी त्याने तिला अश्लील मॅसेज पाठवून तिची सोशल मिडीयावर बदनामी केली होती. आरोपीचे त्याच्या पत्नीसोबत कौटुंबिक वाद होता. या वादानंतर तो त्याच्या वडिलांकडे दहिसर येथे राहण्यासाठी आला होता. त्याला तिच्या जीवनात घडणार्या काही गोष्टींची माहिती होती, त्यामुळे तो मॅसेजमध्ये तिच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी नमूद करुन तिला अप्रत्यक्षपणे धमकावून तिची बदनामी करत होता असे तपासात उघडकीस आले.