राज्यातील सोळा पोलीस उपायुक्तांच्या बदल्या
संदीप भाजीभाकरे नागपूरला तर दत्ता नलावडेची मुंबई लोहमार्ग येथे बदली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ ऑगस्ट २०२४
मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) – राज्यातील पोलीस उपायुक्त दर्जाच्या सोळा पोलीस अधिकार्यांच्या मंगळवारी गृहविभागाने बदल्या केल्या आहेत. त्यात मुंबई लोहमार्ग विभागाचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांची नागपूरला तर त्यांच्या जागी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांची बदली दाखविण्यात आली आहे. नवी मुंबईचे विवेक पानसरे, प्रदीप चव्हाण यांची मुंबईत पोलीस उपायुक्त बदली करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्य पोलीस दलातील काही आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या सुरु होत्या तर काही अधिकारी बदल्यांच्या प्रतिक्षेत होते. अखेर मंगळवारी सायंकाळी गृहविभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांची राज्य पोलीस दलातील पोलीस उपायुक्त-अधिक्षक पदाच्या सोळा पोलीस अधिकार्यांच्या बदलाचे आदेश जारी केले आहे. या पोलीस अधिकार्यांना बदल्यांच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. या बदल्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरचे एटीएसचे पोलीस अधिक्षक संदीप पालवे यांची नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई लोहमार्ग विभागाचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांची नागपूरच्या राज्य गुप्तवार्ता विभाग, गडचिरोलीचे राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक विवेक विठ्ठल मासाळ यांची पुणे शहर पोलीस उपायुक्त, ठाणे शहराचे पोलीस उपायुकत सचिन बाळासाहेब गुंजाळ यांची छत्रपती संभाजीनगर एटीएस विभाग, पुण्याचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांची छत्रपती संभाजीनगर पोलीस उपायुक्त, अमरावती नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड यांची नागपूर लोहमार्गच्या अप्पर पोलीस अधिक्षक, नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्त, नागपूरच्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांची नवी मुंबई पोलीस उपायुक्त, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयच्या मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण यांची मुंबई पोलीस उपायुक्त, छत्रपती संभाजीनगरच्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांची ठाणे शहर पोलीस उपायुक्त, मुंबईचे पोलीस उपायुक्त दत्ता किसन नलावडे आणि राजू भुजबळ यांची अनुक्रमे मुंबई लोहमार्ग आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयच्या मुख्य सुरक्षा अधिकारी, छत्रपती संभाजीनगरच्या नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधिक्षक रुपाली पोपटराव दरेकर यांची छत्रपती संभाजीनगर, महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधिक्षक, छत्रपती संभाजीनगर, महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधिक्षक लता पाटलोबा फड यांची छत्रपती संभाजीनगरच्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्त, पुण्याचे पोलीस उपायुक्त विक्रांत विश्वास देशमुख यांची पुण्याच्या महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.