मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 एप्रिल 2025
मुंबई, – मद्यप्राशन करुन वाहन चालवू नका असे वारंवार मुंबई वाहतूक पोलिसाकडून जनजागृती करुनही मद्यप्राशन करुन गाडी चालविण्याच्या गुन्ह्यांत कमी झालेली नाही. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अशा मद्यपीविरुद्ध आता वाहतूक पोलिसांनी कारवाई बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत 22 मद्यपीविरुद्ध 20 पोलीस ठाण्यात ड्रंक अॅण्ड ड्रायव्हिंगचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आता मद्यप्राशन करुन गाडी चालविल्यास त्याच्यावर थेट गुन्हा होणार आहे. संबंधित वाहनचालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द व्हावा तसेच त्याचे वाहन जप्त करण्याची कारवाई होणार आहे. तशी शिफारसच वाहतूक पोलिसाकडून आरटीओकडे करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या वाहतूक नियमांचे काही चालकाकडून सर्रासपणे उल्लघंन केले जाते. त्यात मद्यप्राशन करुन वाहन चालवू नका, स्वतसह दुसर्या जिवाला धोका निर्माण होईल असे कृत्य करु नये असे वारंवार सांगून मद्यप्राशन करुन वाहन चालविल्याचे तसेच त्यातून अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक उपाययोजना आणि उपक्रम राबवूनही मद्यपी चालकांची संख्या कमी झाली नाही. त्यात अनेकांचा नाहक बळी गेला होता. याबाबत अनेकदा जनजागृती करुनही त्याकडे काही मद्यपी चालक जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा मद्यपी चालकाविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली होती. या मोहीमेतर्गत 4 एप्रिल ते 6 एप्रिल 2025 या कालावधीत अशा मद्यपी चालकाविरुद्ध वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
या मोहीमेंत वीस प्रकरणात बावीस मद्यपींवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यांच्याविरुद्ध आता थेट पोलीस ठाण्यात 125 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत बावीसजणांविरुद्ध गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. या बावीसजणांमध्ये अंकुश रमेश साळुंखे, उमंग सत्येंद्रनाथ ठाकूर, जयेश मधुसुदन मंडवाल, गौरव मालकोटी, संतोष आत्माराम गावडे, अभिषेक दिनानाथ दुबे, अनिकेत लक्ष्मण अंब्राळे, मुकेश कैलास साव, हेतुल पुरुषोत्तम रामजीयानी, सुहास लक्ष्मण राणे, कलिष्का विनोद झक्का, सागर विरेंद्र सिंग, धर्मेंद्र महेश सिंग, नंदकिशोर संतराम कोरी, विपुल अक्षय मिश्रा, विपुल शरद चंदनशिवे, सुरेश देवीराम सोनार, गिरीशचंद्र शिवचंद्र शुक्ला, शब्बीर अब्दुल शकुर शेख, मयुर पंढरीनाथ साखरे, मोहम्मद इरफान वाहजुद्दीन खान आणि दुखन साब अग्रीत साब यांचा समावेश आहे.
या मद्यपी चालकांचे लायसन्स रद्द किंवा निलंबन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यांचे वाहन जप्त करण्याची शिफारसही लवकरच वाहतूक पोलिसाकडून आरटीओकडे केली जाणार आहे. गुन्हा दाखल झालेल्या संबंधित व्यक्तीला खाजगी आणि शासकीय नोकरी मिळणार नाही. पासपोर्टसाठी अर्ज करता येणार नाही. पासपोर्ट नूतनीकरण होणार आहे. ड्रायव्हिंग लायसनस होणार आहे. त्यामुळे या कायद्यांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश वरिष्ठांकडून वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहे. त्यामुळे ड्रंक अॅण्ड ड्रायव्हिंगविरोधात आता वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.