दिल्ली-महाराष्ट्र एटीएसची संयुक्तपणे कारवाईत दोन संशयितांना अटक

खेळण्याच्या कारमधून मुंबई-दिल्लीत घातपाताची योजना होती

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 एप्रिल 2026
मुंबई, – पाकिस्तानच्या आयएसआय आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दोन तरुणांना कुर्ला आणि खडवली परिसरातून दिल्ली आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत ताब्यात घेतले. या दोघांनाही पुढील कारवाईसाठी दिल्लीत नेण्यात आले आहे. मुंबईसह दिल्लीत जैशने खेळण्याच्या कारमधून मोठ्या प्रमाणात घातपात घडविण्याची बनविली होती, या योजनेची संबंधित तरुणांना माहिती होती, त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे बोलले जाते. या दोघांकडून मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही आक्षेपार्ह दस्तावेज हस्तगत करण्यात आले आहे.

आगामी दिवसांत मुंबईसह दिल्ली शहरात मोठ्या घातपाताच्या तयारी जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना सक्रिय झाली होती. या संघटनेला पाकिस्तानच्या आयएसआयकडून मदत केली जात होती. त्यासाठी मुंबईसह दिल्लीतील काही तरुणांना हाताशी धरुन खेळण्याच्या कारमधून संबंधित तरुण येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात घातपात घडवून आणणार होते. मुंबईतील कुर्ला आणि खडवली परिसरातील काही तरुण संबंधित दशहतवाद्यांच्या संपर्कात असून त्यांच्या सूचनांचे पालन करत असल्याची माहिती दिल्लीतील विशेष शाखेला मिळाली होती. ही माहिती महाराष्ट्र एटीएसशी शेअर करुन दिल्लीचे एक विशेष पथक मुंबईत दाखल झाले होते. या पथकाने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने कुर्ला आणि खडवली परिसरात संयुक्तपणे कारवाई करुन दोन संशयित तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडील दोन मोबाईल, इलेक्ट्रीक साहित्य आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहे. या मुद्देमालातून ते दोघेही काही दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी दिल्लीत नेण्यात आले आहे. या दोघांच्या संपर्कात आणखीन काही तरुण संपर्कात होते. त्यांच्यावर एटीएसची नजर असून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. योग्य वेळी या तरुणांवर कारवाई केली जाणार असल्याचे बोलले जाते. या कारवाईबाबत महाराष्ट्र एटीएसकडून अधिकृत काहीही माहिती देण्यात आली नाही.

दरम्यान अटकेत असलेल्या दोन्ही तरुणांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. मुंबईसह दिल्लीत घातपात घडविण्यासाठी जैशने एक विशेष युनिटची नियुक्ती केली होती. त्यांच्या इतर सहकार्‍यांच्या अटकेसाठी आता दिल्ली विशेष पथकासह महाराष्ट्र एटीएसने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page