हिरे व्यापार्याची फसवणुक करणार्या आरोपीस सात वर्षांनी अटक
२७ लाखांचा हिर्यांचा अपहार; उत्तरप्रदेशातून ताब्यात घेतले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ एप्रिल २०२४
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे २७ लाखांचा हिर्यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्याची फसवणुक करुन पळून गेलेल्या मुख्य आरोपीस सात वर्षांनी उत्तरप्रदेशातून गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. भोलाप्रसाद वर्मा असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. गेल्या सात वर्षांपासून त्याच्या मागावर पोलीस होते, मात्र मुंबईतून पळून गेल्यानंतर तो उत्तरप्रदेशात वास्तव्यास होता, अखेर त्याला गोरखपूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.
यातील तक्रारदार हिरे व्यापारी असून त्यांचा वांद्रे येथील बीकेसी परिसरात हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. सात वर्षांपूर्वी त्यांनी भोलाप्रसादला विक्रीसाठी सुमारे २७ लाख रुपयांचे हिरे दिले होते. मात्र या हिर्यांचा अपहार करुन तो पळून गेला होता. दिलेल्या मुदतीत भोलाप्रसादने हिरे परत केले नाही किंवा हिर्यांच्या विक्रीतून आलेले पेमेंट केले नव्हते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध तक्रारदार व्यापार्याने बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. भोलाप्रसादने स्वतच्या अस्तिस्तावाचे सर्व पुरावे नष्ट करुन मुंबईतून पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी बीकेसी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच तो उत्तरप्रदेशातील गोरखपूर शहरात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई, प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर धुतराज, राहुल प्रभू, पोलीस उपनिरीक्षक विकास मोरे, पोलीस हवालदार यादव, काकडे, सावंत, कुरकूटे, कांबळे, पोलीस शिपाई रहेरे, सटाले, महिला पोलीस शिपाई गायकवाड, भिताडे, पोलीस शिपाई बिडवे यांनी गोरखपूर येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने भोलाप्रसादला ताब्यात घेतले. चौकशीत फसवणुकीच्या गुन्ह्यांतील तो आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापार्यांची फसवुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.