84 वर्षांच्या वयोवृद्ध पॅथोलॉजिस्ट महिलेची 46 लाखांची फसवणुक

डिजीटल अरेस्टची धमकी देणार्‍या तोतया अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 मार्च 2025
मुंबई, – अंधेरी येथे राहणार्‍या एका 84 वर्षांच्या वयोवृद्ध पॅथोलॉजिस्ट महिलेची सुमारे 46 लाखांची तोतया सीबीआय अधिकार्‍यांनी फसवणुक केली. मनी लॉड्रिंगप्रकरणी कारवाईची धम्की देणार्‍या या तोतया अधिकार्‍याविरुद्ध सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांत डिजीटल अरेस्टच्या नावाने अनेकांना सायबर ठगांकडून गंडा घातला जात असून डिजीटल अरेस्ट असा कुठलाही प्रकार नसल्याने लोकांनी सतर्क राहून अशा सायबर ठगांची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन सायबर सेल पोलिसांकडून करण्यात आला आहे.

अलबेलू सुब्रमण्यम अय्यर ही 84 वर्षांची तक्रारदार महिला अंधेरीतील महाकाली गुंफा रोड, बिद्रा कॉम्प्लेक्समध्ये राहते. ती पॅथोलॉजिस्ट असून तिचे स्वतचे सायन येथे अय्यर पॉलिक्लिनिक होते. मात्र वयामुळे त्यांनी निवृत्ती घेतली होती. 20 डिसेंबर 2024 रोजी ती तिच्या अंधेरीतील राहत्या घरी होती. यावेळी तिला एक व्हिडीओ कॉल आला होता. समोरील व्यक्तीने तो सीबीआय अधिकारी अजयकुमार असल्याचे सांगून तिच्या बँक खात्यातून मनी लॉड्रिंग झाल्याचा आरोप आहे. हा एक गंभीर गुन्हा असून या गुन्ह्यांचा सीबीआय आणि ईडीकडून सुरु आहे. त्यांच्या कागदपत्रांवरुन एका बँकेत खाते उघडण्यात ाअले आहे. या खात्यासह 248 बँक खात्यात 60 कोटीचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगितले.

काही वेळानंतर तिला परवीन सूद नावाच्या महिलेने कॉल करुन तिच्या अडचणीत वाढ झाली असून तिच्यावर कोणत्याही अटकेची कारवाई होईल अशी भीती दाखविली होती, यावेळी तिने तिचा कुठल्याही बँक खात्यासह मनी लॉड्रिंगशी संबंध नसल्याचे सांगितले. तरीही तिने तिच्यावर कारवाई करणार असल्याचे चौकशीला सहकार्य करावे अशी विनंती केली होती. त्यानंतर या अधिकार्‍यांनी तिच्या बँक खात्यासह प्रॉपटीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तपास पूर्ण होईपर्यंत तिला तिच्या बँक खात्यातून कुठलाही व्यवहार करता येणार नाही. तिच्या बँकेतील रक्कम तिने दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करा. चौकशी पूर्ण झाल्यानंतर तिची रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाईल असे सांगितले. तिने तसे न केल्यास तिला तिच्या राहत्या घरातून अटक केली जाईल असे सांगून तिच्या मनात अटकेची भीती निर्माण केली होती.

20 डिसेंबर 2024 ते 27 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तिने तिच्या बँक खात्यातून विविध बँक खात्यात सुमारे 46 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र ही रक्कम पाठविल्यांनतर तिची कोणीही चौकशी केली नाही किंवा तिचे पैसे तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले नव्हते. त्यामुळे तिने हा प्रकार तिची भाची व्यकंट रामन हिला सांगितला. यावेळी तिने डिजीटल अरेस्ट फसवणुकीचा प्रकार असून तिची संबंधित तोतयांनी फसवणुक केल्याचे सांगून तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित तोतया सीबीआय अधिकार्‍याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अजयकुमार आणि परवीन सूद नाव सांगणार्‍या तोतया अधिकार्‍याविरुद्ध पोलिसांनी कट रचून फसवणुक करणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page