मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टच्या नावाने फसवणुक
१.३२ कोटीची फसवणुकीप्रकरणी सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ जानेवारी २०२५
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टच्या नावाने एका वयोवृद्ध महिलेची सायबर ठगांनी १ कोटी ३२ लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून डिजीटल अरेस्टच्या नावाने होणार्या फसवणुकीच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे सायबर सेल पोलिसांची प्रचंड डोकेदुखी वाढली आहे. डिजीटल अरेस्टबाबात सतत जनजागृती करुनही सायबर ठग अनेकांना विशेषता वयोवृद्धांना टार्गेट करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
मधु रमेशंद्र सेनानी ही ८२ वर्षांची वयोवृद्ध तक्रारार महिला वांद्रे येथे राहते. तिचे चार वेगवेगळ्या बँकेत बचत खाते आहेत. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी ती तिचया घरी होती. यावेळी तिला एका व्हॉटअप कॉल आला होता. या व्यक्तीने स्वतचे नाव राजवीर कुंद्रा असल्याचे सांगूनत तो ट्राय मधून बोलत असल्याचे सांगितले. तिच्या बँक खात्याचा वापर मनी लॉड्रिंगसाठी झाला असून तिच्यावर कारवाई होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला राहुल गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने संपर्क साधून तो सर्वोच्च न्यायालयातून बोलत असल्याचे सांगितले. त्याने तिच्या नावाने सर्वोच्च न्यायालयाने काही कागदपत्रे पाठविले होते. ते कागदपत्रे पाहत असताना तिला पुन्हा राहुल शर्मा नावाच्या एका व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला हेता. संबंधित व्यक्ती पोलीस गणवेशात होता. त्याच्या प्रोफाईलमध्ये मुंबई पोलिसांचा लोगो होता. त्याने तिच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास पूर्ण होईपर्यंत तिला डिजीटल अरेस्ट झाल्याचे सांगतले. यादरम्यान तिला कोणाशी संपर्क साधता तसेच या गुन्ह्यांची माहिती कोणालाही शेअर करता येणार नाही.
तिने शासकीय गुप्ततेचा भंग केल्यास तिच्यावर तिच्या घरात येऊन अटकेची कारवाई केली जाईल असे सांगितले. या प्रकारानंतर ती प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने त्याला तिच्याकडे पूर्ण सहकार्य केले जाणार असल्याचे आशवासन देण्यात आले. २९ नोव्हेंबर ते १४ डिसेंबरला या कालावधीत तो तिच्या संपर्कात होता. त्यामुळे तिने ही माहिती कोणालाही सांगितली नव्हती. याच दरम्यान त्यांनी तिची वेयक्तिक माहितीसह आर्थिक व्यवहार, बँक खात्याची, उत्पनाची माहती काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिने त्यांना सर्व माहिती शेअर केली होती. यावेळी त्याने तिला आरपीआयच्या गोपनीय बँक खात्यात काही रक्कम पाठविण्यास प्रवृत्त केले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने ९ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२४ या कालावधीत त्याने दिलेल्या बँक खात्यात १ कोटी ३१ लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम ट्रान्स्फर केल्यानंतर राहुल शर्माने तपास पूर्ण होताच सहा दिवसांत ही रक्कम तिच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर केली जाईल असे सांगितले.
मात्र दहा दिवस उलटूनही ही रक्कम तिच्या बँक खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे तिने राजवीर कुंद्रा अणि राहुल शर्माला संपर्क साधला होता, मात्र त्यांच्याशी तिचा संपर्क होऊ शकला नाही. या दोघांचेही मोबाईल बंद होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने घडलेला प्रकार तिचा मुलगा मोहन सेनानी आणि मुलगी निकी मोतीयानी हिला सांगितला. त्यांच्याकडून तिला हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे समजले. त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने स्थानिक पोलीस ठाण्यासह सायबर हेल्पलाईन आणि सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांचा तपास सायबर सेल पोलिसाकडे वर्ग करण्यात आला आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे. त्या बँक खात्याची माहिती काढण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टच्या नावाने अनेकांना विशेषता वयोवृद्धांची फसवणुक होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.