डिजीटल अटकेच्या भीतीने 80 वर्षांच्या वयोवृद्धाची फसवणुक
26 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 डिसेंबर 2025
मुंबई, – सिमकार्डवरुन मुलींना अश्लील शिवीगाळ करुन मानवी तस्करी तसेच मनी लाड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टची भीती दाखवून एका 80 वर्षांच्या वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगाने सुमारे 26 लाखांची फसवणुक केल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध उत्तर प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
यातील वयोवृद्ध तक्रारदार दिलीप गिरीधर गढिया हे कांदिवली येथे त्यांच्या पत्नी हंसासोबत राहतात. 25 नोव्हेंबर 2025 रोजी ते नाशिक येथील देवळाली मंदिरात गेले होते. याच दरम्यान त्यांना विनय शर्मा नावाच्या एका व्यक्तीचा कॉल आला होता. तयाने तो बंगलोरच्या सायबर सेलमधून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या नावावरील सिमकार्डवरुन काही मुलींना शिवीगाळ केली जात आहे. मानवी तस्करी होत असल्याचा आरोप केला. तेलंगणायेथील सदाकन खान याच्या घरी छापा टाकल्यानंतर तिथे पोलिसांना 187 सिमकार्ड, एटीएम कार्ड सापडले. त्यांच्या माटुंगा येथील बँकेतील खात्यात सदाकनने तीस लाख रुपये ट्रान्स्फर केले आहे.
याबाबत बंगलोरच्या अशोकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यांबाबत त्यांची चौकशी सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना संदीप राव नावाच्या व्यक्तीने व्हाईस कॉल केला होता. यावेळी त्यांनी ते नाशिक येथे असल्याचे सांगून त्यांचा या गुन्ह्यांशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांना मुंबईत जाण्याचा सल्ला दिला. 27 नोव्हेंबरला त्यांना व्हॉटअपर व्हिडीओ कॉल करुन त्याने त्यांच्या नावाने अरेस्ट वॉरंट पाठविले होते. त्यांना डिजीटल अरेस्ट केल्याचे सांगून त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्यांना नवज्योत सिमीने कॉल करुन तुम्ही घाबरु नका, वेळेवर औषधे घ्या. त्यांचे अरेस्ट वॉरंट कॅन्सल करते असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.
चर्चेदरम्यान नवज्योतने त्यांच्याकडून त्यांच्या बँक खात्याची डिटेल्स जाणून घेण्याचा प्रयतन केला. तिने त्यांना त्याचे 26 लाखांचे एफडी मोडून ती कॅश ट्रान्स्फर करण्यास सांगितले. कारवाईसह अटकेच्या भीतीने त्यांनी 26 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. यावेळी नवज्योतने हा प्रकार कोणालाही सांगू नका, कोणाशी ही माहिती शेअर करु नका, त्यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्यावर कारवाई होईल असे सांगितले. त्यानंतर ते त्यांना दोन तासांनी रिपोर्ट करत होते, मात्र त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नव्हता.
सायबर ठगाकडून आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित सायबर ठगाविरुद्ध तक्रार केलीहोती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनय शर्मा, नवज्योती सिमी आणि संदीप राव नाव सांगणार्या या ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.