मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2025
मुंबई, – विविध तपास यंत्रणेकडून तपास सुरु असून एका व्यक्तीला डिझीटल अरेस्टची भीती दाखवून त्याला तीन महिन्यांत 42 वेगवेगळ्या ऑनलाईन 7 कोई 67 लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करुन फसवणुक करणार्या एका टोळीचा केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुंबईसह उत्तरप्रदेश, जयपूर आणि कोलकाता येथून चारजणांना या अधिकार्यांनी अटक केली आहे. या चौघांनी तक्रारदार व्यक्तीसह इतर काही व्यक्तींना डिझीटल अरेस्टच्या नावाने कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्या अटकेने अशा इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अटकेनंतर चारही आरोपींना विशेष कोर्टाने पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार राजस्थानचे रहिवाशी आहेत. जानेवारी महिन्यांत त्यांना विविध तपास यंत्रणेकडून कॉल आले होते. त्यांचा मनी लॉड्रिंगसह इतर देशद्रोही गुन्ह्यांत सहभाग असल्याचा आरोप करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले. याच गुन्ह्यांत त्यांची चौकशी सुरु आहे. चौकशी सुरु असेपर्यंत ते डिझीटल अरेस्ट असतील. या कालावधीत त्यांना कोणाला संपर्क साधता येणार नाही. कोणाशी बोलता येणार नाही. या गुन्ह्यांसंदर्भात कुठेही चर्चा करता येणार नाही. त्यांनी दिलेल्या नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी येऊन अटकेची कारवाई केली जाईल अशी भीती दाखविण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या बँकेसह प्रॉपटीविषयी माहिती काढण्यात आली होती.
तीन महिन्यांत त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. या तीन महिन्यांत त्यांनी 7 कोटी 67 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. चौकशी संपल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम पुन्हा ट्रान्स्फर करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र ही रक्कम ट्रान्स्फर केल्यानंतर त्यांची चौकशी अचानक थांबली होती. त्यांना नंतर कोणाचे चौकशीसाठी कॉल आले नाही. हा प्रकार परिचित लोकांना सांगितल्यानंतर त्यांना त्यांची अज्ञात सायबर ठगांकडून फसवणुक झाल्याचे समजले होते. त्यानंतर त्यांनी झुनझुन येथील सायबर सेल विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास सीबीआयकडे सोपविला होता. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या अनेक तक्रारी सीबीआयला प्राप्त झाले होते. त्यामुळे या गुन्ह्यांची सीबीआयने चौकशी सुरु केली होती. तांत्रिक माहितीवरुन या पथकाने मुंबईसह उत्तरप्रदेश, जयपूर आणि कोलकाता येथून चार आरोपींना ताब्यात घेतले होते. या चौघांकडून पोलिसांनी विविध बँकेचे डेबीट कार्ड, पासबुक, धनादेशासह इतर दस्तावेज जप्त केला आहे. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.
अशा प्रकारे फसवणुक करणारी एक सराईत टोळीने असून या टोळीने देशभरात अनेक गुन्हे केल्याचे बोलले जाते. या गुन्ह्यांत त्यांच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या अटकेने डिझीटल अरेस्टच्या नावाने झालेल्या काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.