मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 मे 2025
मुंबई, – पूर्व वैमस्नातून एका 26 वर्षांच्या तरुणावर त्याच्याच नातेवाईकाने चाकूने हल्ला केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. या हल्ल्यात केवल धीरज मकवाना हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरोपी नातेवाईक सचिन अमृत बोरिया ऊर्फ राजू याला दिडोंशी पोलिसांनी अटक केली आहे. सचिन हा धीरजचा आत्याचा मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शनिवारी रात्री पावणेअकरा वाजता गोरेगाव येथील संतोषनगर, जी दोनच्या बीएमसी कॉलनीत घडली. याच परिसरात धीरज गिगाभाई मकवाना हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून केवल हा त्यांचा मुलगा आहे. सचिन हा त्यांच्या बहिणीचा मुलगा असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात जुना वाद होता. याच वादातून शनिवारी सचिनने केवलवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या हाताला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये आले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
ही माहिती मिळताच दिडोंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी धीरज मकवाना यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सचिन बोरिया याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.