मित्रासोबतचा व्हिडीओ व्हायरलची धमकी देऊन लैगिंक अत्याचार
५३ वर्षांच्या आरोपीसह वॉच ठेवणार्या तरुणाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ डिसेंबर २०२४
मुंबई, – एका तरुणासोबत मैत्री करण्यास प्रवृत्त करु मित्रासोबतचा व्हिडीओ पालकांना सह सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच ५३ वर्षांच्या परिचिताने लैगिंक अत्याचार केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच आरोपीसह वॉच ठेवणार्या आरोपीस डी. एन नगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिडीत मुलगी ही अंधेरी परिसरात राहत असून सध्या शिक्षण घेत आहे. याच परिसरात आरोपी राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. नोव्हेंबर महिन्यांच्या दुसर्या आठवड्यात त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने तिच्याशी सुमीत नावाच्या एका तरुणासोबत ओळख करुन दिली होती. त्याच्याशी तिला मैत्री करण्यास प्रवृत्त केले होते. सुमीतशी गप्पा मारत असताना त्याने या दोघांचे मोबाईलवरुन व्हिडीओ बनविला होता. तो व्हिडीओ तिच्या पालकांना दाखवून तिची बदनामी करण्याची त्याने तिला धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे ही मुलगी प्रचंड घाबरली होती. याच संधीचा फायदा घेऊन त्याने तिला घरी आणून ८ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता.
ते दोघेही एकाच परिसरात राहत असल्याने त्याच्या घरी कोणी आल्यास त्याने घराबाहेर एका तरुणाला वॉच ठेवण्यास सांगितले होते. ज्या ज्या वेळेस या मुलीवर आरोपी लैगिंक अत्याचार करत होता, त्या प्रत्येक वेळेस तो तिथे वॉच म्हणून थांबत होता. हा प्रकार अलीकडेच तिने तिच्या पालकांना सांगितला होता. ही माहिती ऐकून त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी डी. एन नगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीसह तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.