बॉम्बचा ट्विट करणार्या मुलावर अनैगिंक लैगिंक अत्याचार
डोंगरी बालसुधारगृहातील घटना; सोळा वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – विमानात बॉम्ब असल्याचा ट्विट करुन संपूर्ण पोलीस यंत्रणेला कामाला लावणार्या एका सतरा वर्षांच्या मुलावर त्याच्याच सहकारी सोळा वर्षांच्या मुलाने अनैसगिंक लैगिंक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना डोंगरीतील उमरखाडी, बालसुधारगृहात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोळा वर्षांच्या आरोपी मुलाविरुद्ध डोंगरी पोलिसांनी पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपी मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सोमवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने बालसुधारगृहातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.
पिडीत सतरा वर्षांचा मुलगा मूळचा छत्तीसगढचा रहिवाशी आहे. गेल्या आठवड्यात त्याने एका ट्विटद्वारे विमानात बॉम्ब असल्याचा मॅसेज पाठविला होता. याप्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन सहार पोलिसांच्या एका विशेष पथकाने छत्तीसगढ येथून आरोपी अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. तेव्हापासून तो तिथे राहत होता. सोमवारी सकाळी नऊ वाजता तो टॉयलेटमध्ये गेला होता. यावेळी त्याच्यासोबत राहणारा सोळा वर्षांचा आरोपी मुलगा तिथे गेला. त्याने त्याच्या तोंडात ऑरेज कलरच्या अंदाजे दहाहून अधिक जास्त गोळ्या आणि पांढर्या रंगाची पावडर कोंबली होती. त्याने त्याने त्याच्यासोबत टॉयलेटमध्येच अनैसगिंक लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता.
हा प्रकार नंतर पिडीत मुलाकडून संबंधित कर्मचार्यांना समजताच त्यांना धक्काच बसला होता. ही माहिती नंतर डोंगरी पोलिसांना देण्यात आली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पिडीत मुलाची जबानी नोंदवून पोलिसांनी आरेापी अल्पवयीन मुलाविरुद्ध पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पिडीत मुलाला जे. जे हॉस्पिटलमध्ये मेडीकलसाठी पाठविण्यात आले आहे. तपासात आरोपी आणि पिडीत मुलगा बालसुधारगृहातील एका बॅरकमध्ये राहत होते.