मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ जुलै २०२४
मुंबई, – बँकॉंकहून आणलेल्या गांजासह एका भारतीय प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्यांनी अटक केली. त्याच्याकडून या अधिकार्यांनी ५ किलो ३४० ग्रॅम वजनाचा उच्च प्रतीचा गांजा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे पाच कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. हा गांजा त्याने नऊ व्हॅक्यूम पॅकेटमधून लपवून आणला होता. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बँकॉंकहून काहीजण कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्यांना मिळाली होती. त्यामुळे विदेशातून येणार्या प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या सामानाची या अधिकार्यांनी तपासणी सुरु केली होती. ही कारवाई सुरु असतानाच सोमवारी सायंकाळी बँकॉंकहून आलेल्या एका प्रवाशाला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात नऊ व्हॅक्यूम पॅक केलेले चांदीच्या पिशव्या सापडल्या. या पॅकेटमधून उच्च प्रतीचा गांजाचा साठा लपवून ठेवण्यात आला होता. या कारवाईत पोलिसांनी ५ किलो ३४० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे पाच कोटी रुपये इतकी आहे. याच गुन्ह्यांत नंतर या प्रवाशाला एनडीपीएस कलमांतर्गत अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.