मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ डिसेंबर २०२४
मुंबई, – डीजे लाईटच्या आत सोने लपवून तस्करी करणार्या एका टोळीचा महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन आरोपींना या अधिकार्यांनी अटक करुन त्यांच्याकडून बारा किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत ९ कोटी ६० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात या अधिकार्यांनी विविध कारवाईत ४८ किलो सोने जप्त केले असून त्याची किंमत सुमारे ३८ कोटी रुपये असल्याचे बोलले जाते.
भारतात सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच गेल्या काही महिन्यांत विदेशातून सोने तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. संबंधित आरोपी सोने तस्करीसाठी विविध आयडिया शोधून काढत तस्करी करण्याचा प्रयत्न करत आहेत. कधी गृहपयोगी वस्तू तर कधी बॅगचा वापर करुन तस्करी करतात. खास करुन संबंधित आरोपी कॅरिअर म्हणून महिलांचा वापर करतात. पण महिलांची तस्करीची पद्धत तपास यंत्रणा समजल्यानंतर या आरोपींनी आता तस्करीची पद्धत बदल्याचे बोलले जाते. आरोपी सोने तस्करीसाठी वस्तूच्या आड तस्करी करु लागले ओ. विमानतळ येथील एअर कार्गो डी जे लाईटच्या आड सोने तस्करी होणार असल्याची माहिती डीआरआयच्या मुंबई युनिटला माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने एअरपोर्टच्या एअर कार्गोमधील गोदामात छापा टाकला होता.
यावेळी तिथे या अधिकार्यांना ६८ डी जे लाईट दिसल्या. त्या लाईटस तपासणी केली असता तत या अधिकार्यांना बारा किलो सोने सापडले. या सोन्याची किंमत ९ कोटी ६० लाख रुपये आहे. सोने तस्करीप्रकरणी दोन आरोपींची नावे समोर आली होती. त्यानंतर या अधिकार्यांनी दोन्ही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांचा सोने तस्करीत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात या अधिकार्यांनी विविध कारवाईत ४८ सोने किलो सोने जप्त केले आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे ३८ कोटी रुपये आहे. अटक केलेलेते दोघेही नेमके कोणाला सोने देणार होते. ते तस्करी करणार्या टोळीशी संबंधित आहेत का याचा तपास डीआरआयचे अधिकारी करत आहेत.