मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – दुबईहून चोरट्या मार्गाने आणलेल्या ६ कोटी २८ लाखांच्या गोल्डसह तीन इराणी प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या अधिकार्यांनी अटक केली. या तिन्ही प्रवाशांकडून या अधिकार्यांनी ७ किलो १४३ ग्रॅम वजनाचे गोल्ड बार जप्त केले आहेत.
गेल्या काही दिवसांत गोल्ड आणि ड्रग्ज तस्करीच्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकारी अलर्ट झाले आहेत. त्यामुळे विदेशातून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी केली जात आहे. गुरुवारी रात्री दुबईहून तीन इराणी प्रवाशी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. विमानतळाबाहेर जाण्याच्या तयारीत असलेल्या या तिन्ही प्रवाशांना डीआरआयच्या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यापैकी दोघांनी परिधान केलेल्या कपड्याखाली लपवलेल्या कंबरेतील बॅगेतून सात कलो विदेशी गोल्ड बार आणि विदेशी गोल्ड बारचा एक लहान तुकडा जप्त केला आहे.
या तिन्ही प्रवाशांकडून या अधिकार्यांनी ७ किलो १४३ ग्रॅम वजनाचे गोल्ड बार जप्त केले असून त्याची किंमत ६ कोटी २८ लाख रुपये इतकी आहे. त्यांच्यासोबत असलेल्या तिसर्या प्रवाशांच्या सांगण्यावरुन त्यांनी ते गोल्ड बार लपवून आणले होते. त्यासाठी या दोघांना दुबई-मुंबई विमानाचे तिकिट आणि काही रक्कम कमिशन म्हणून देण्याचे ठरले होते. गोल्ड तस्करी केल्याप्रकरणी या तिन्ही प्रवाशांवर नंतर सीमा शुल्क कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती.