मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 एप्रिल 2025
मुंबई, – शेताच्या आड गांजाची शेतीचा महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. एकूण 9.4 एकर जमिनीच्या शेतीमध्ये सात ठिकाणी गांजाची शेती करण्यात आल्याचे उघडकीस आले. घटनास्थळाहून या अधिकार्यांनी कोट्यवधी रुपयांचा 490 किलो गांजाचा साठा जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यांतील उसाच्या शेतीआड हा गांजाची शेती लावण्यात आली होती.
धुळे जिल्ह्यांतील खामखेडा आंबे आणि रोहिणी गावात बेकायदेशी गांजाची शेती केली जात असून या गांजाची नंतर राज्यातील विविध शहरात तस्करी होत असल्याची माहिती मुंबई युनिटच्या डीआरआयच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी मुंबई युनिटच्या अधिकार्यांनी पुणे आणि नागपूर डीआरआयच्या अधिकार्यांच्या मदतीने संयुक्तपणे कारवाई करण्यास सुुवात केली होती. या पथकाने मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेजवळील एका दुर्गम भागात कारवाई केली होती. यावेळी तिथे उसाच्या शेतीआड मोठ्या प्रमाणात गांजाची शेती करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या पथकाने जिल्हा प्रशासन आणि महानगर दंडाधिकार्यांना घटनास्थळी येण्याची विनंती केली होती. त्यांच्याच उपस्थितीत या अधिकार्यांनी तिथे कारवाईला सुरुवात केली होती. त्यात 9.4 एकरच्या क्षेत्रफळात सात ठिकाणी गांजाची बेकायदेशीर शेती करण्यात आली होती.
घटनास्थळाहून या अधिकार्यांनी 490 किलो गांजाचा साठा जप्त केला आहे. जप्त गांजाची किंमत कोट्यवधी रुपये आहे. हा साठा नंतर या अधिकार्यांनी जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर काही संशयितांना या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी सुरु आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी गांजाची शेती केली जात होती. या गांजाची नंतर राज्याच्या विविध शहरात विक्री केली जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. उत्पादन वाढविण्यासाठी तिथे ठिबक संचनाचा वापर केला जात होता. उसाच्या शेतीआड गांजाची शेती होती. शेतात मोठ्या प्रमाणात गांजा भरुन ठेवण्यात आला होता. याप्रकरणी एनडीपीएस कलमांर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.