इव्हेंटचा बनावट पास विकणाऱ्या दोघांना अटक 

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ एप्रिल २०२४
मुंबई, –  वांद्रे येथील एका संगीताच्या कार्यक्रमाचा बनावट क्यूआर कोड असलेल्या पासेस विक्री प्रकरणी दोघांना बीकेसी पोलिसांनी अटक केली. हरीश चौराटीया आणि विपीन सामरिया अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. 

दोन दिवसापूर्वी बीकेसी येथे संगीताचा कार्यक्रम होता. याची माहिती वडाळा येथे राहणाऱ्या रोशन नावाच्या तरुणाला मिळाली. माहिती मिळाल्यावर रोशन ने एका नंबरवर फोन केला. त्यानंतर हरीशने रोशला फोन करून कार्यक्रमाच्या पासेस बाबत चर्चा केली. पास हवा असल्यास बीकेसी परिसरात भेटा असे त्याला सांगितले. त्यानंतर रोशन हा बीकेसी परिसरात गेला. त्या पासेस ची किंमत साडेचार हजार रुपये असल्याचे सांगितले. १२ पासेस हवे असल्याने रोशन ने ५४ हजार रुपये ऑनलाईन पाठवून दिले.
त्या पासवर एक क्यू आर कोड होता. रोशन ने एक पास स्वतकडे ठेऊन उर्वरित पास त्याच्या मित्राना दिले. सायंकाळी रोशन हा त्याचा मित्रांसोबत कार्यक्रमाच्या ठिकाणी गेला. सुरक्षा रक्षकाने क्यूआर कोड मशीन द्वारे तपासले. तो क्यू आर कोड स्कॅन होत नव्हता. काही वेळाने रोशनचे मित्र तेथे आले. त्याचा देखील क्यु आर कोड स्कॅन होत नव्हता. त्यानंतर रोशन ने हरीशच्या मोबाईलवर संपर्क केला. तेव्हा त्याचा मोबाईल बंद येत होता. रोशन आणि त्याचे मित्र हे हरीशचा शोध घेत होते. अखेर त्याना हरीश बीकेसी परिसरात आढळून आला. रोशनने हरीशला पोलिसांच्या ताब्यात दिले. फसवणुकीची माहिती पोलिसांना दिली. रोशन ने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हरीश विरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ कदम याच्या पथकातील अधिकाऱ्याने तपास सुरु केला. गुन्हा नोंद होताच पोलिसानी हरीशला ताब्यात घेऊन अटक केली. हरीशच्या चौकशीत विपिन चे नाव समोर आले. पोलिसांनी विपीनला अटक केली. हरीश ने त्या पासची कलर झेरॉक्स विपीन कडून काढल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याने किती झेरॉक्स काढल्या होत्या, फसवणुकीचे पैसे कोणाला दिले, त्याचे इतर कोणी साथीदार आहेत का याचा तपास बीकेसी पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page